राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. महायुती आणि महाविकासआघाडी यांच्यात जागावाटपाची चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान निवडणुकीआधी राज्यात आरोप-प्रत्यारोपणाच्या फैरी झाडल्या जात आहेत. दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात माध्यमांशी संवाद साधला आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांच्याकडून महाराष्ट्रात दंगल घडवण्याची भाषा केली जात आहे. यामागील त्यांचा हेतू लक्षात येत नाही, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे केले आहे.
राज्यात शरद पवार यांच्याकडून महाराष्ट्रात दंगल घडवण्याची भाषा केली जात आहे. मात्र राज्यातील जनता हुशार आहे. सावध आहे. काही जण समाजात तेढ निर्माण करणे, आंदोलन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलवण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीत महाविकास आघाडी उपस्थित राहिली नाही. या विषयावर ते बाहेरून बोलून राजकारण करत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत येईल असा विश्वास बावनकुळे याणी व्यक्त केला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणावर भाष्य केले होते. तर मनोज जरांगे पाटील आणि फडणवीसांचे भांडण हे नकली असल्याचे म्हटले आहे. यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, आंबेडकर असे राजकारणासाठी बोलले असावेत. देवेंद्र फडणवीसांना विनाकारण टार्गेट केले जात आहे. देवेंद्र फडणवीसांची भूमिका मराठा आरक्षणाबाबत अत्यंत प्रामाणिक आहे. काहीजण देवेंद्र फडणवीसांची उंची कमी करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे, असे भाष्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.