Raj Thackeray on Pune Flood : गेल्या आठवड्यात राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरस्थितीत निर्माण झाली. यामध्ये पुणे शहराचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. पुण्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे अनेकांचे संसार गेले. नागरिकांना मोठ्या प्रमाणात नुकसानीचा समान करावा लागला. अशातच पुण्यातील या परिस्थितीला कोण जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावरून राजकीय वातावरण देखील तापले आहे, विरोधक यावर जोरदार टीका करताना दिसत आहे.
पुण्यातील पूर परिस्थिती खडकवासला धरणातून पाण्याचा अधिक विसर्ग सोडण्यात आल्याने निर्माण झाली. या प्रकरणात एका अधिकाऱ्याचे निलंबनही करण्यात आलं. मात्र, या परिस्थितीला सर्वचजण जबाबदार आहेत. प्रशासनाकडे जबाबदारी असल्याने प्रशासनच जबाबदार असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. राज ठाकरेंनी पुण्यातील पूरस्थितीवर भाष्य करताना पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही टोला लगावला आहे.
पुण्यातील पूरस्थिती हाताळण्यावरुन राज ठाकरे यांनी महापालिका आणि राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे. पुण्यात उद्भवलेल्या पूरस्थितीवर भाष्य करताना केवळ एका अधिकाऱ्याचे निलंबन करुन हा प्रश्न सुटणार नसल्याचेही राज यांनी ठाकरे म्हटले.
यावर भाष्य करताना राज ठाकरे यांनी अजित पवारांनाही टोला लगावला आहे. राज्यात दोन उपमुख्यमंत्री आहेत, एक तर पुण्यातलेच आहेत. ते या ठिकाणी नसतानाही धरणातून पाणी वाहिलंय. त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालायला नको का, असा मिश्कील टोला राज ठाकरेंनी नाव न घेता अजित पवारांना लगावला आहे.