Kerala Landslide News : केरळमधील वायनाड या जिल्ह्यात भूस्खलनाची भीषण घटना घडली आहे. या घटनेत मृतांची संख्या वाढून 24 झाल्याच झाल्याची बातमी मिळत आहे, तर आणखी शेकडो लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही घटना मंगळवारी सकाळी मेप्पाडी जवळ घडली. सध्या केरळमध्ये पावसाने थैमान घातले आहे. याच पावसामुळे मेप्पाडी भागातील डोंगराळ भागात भूस्खलन झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहचली. याठिकाणी वेगात सेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. केरळच्या वायनाडमधील मेप्पाडी पंचायतीत भूस्खलनामुळे मोठ नुकसान झालय, असं भारतीय सैन्याकडून सांगण्यात येत आहे. सैन्याच्या चार तुकड्या घटनास्थळी आहेत. 122 इन्फँट्री बटालियनच्या (प्रादेशिक सेना) दोन तुकड्या आणि कन्नूर डीएससी सेंटरच्या दोन तुकड्या यामध्ये आहेत. वैथिरी, कलपट्टा, मेप्पाडी आणि मनंतवडी रुग्णालयाला अलर्टवर ठेवलं आहे. वायनाड येथे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आणखी टीम्स तैनात करण्यात येतील.
या घटनेची माहिती मिळताच सर्व सरकारी यंत्रणा कमला लागली असून, हेल्पलाइन क्रमांक 9656938689 आणि 8086010833 जारी करण्यात आला आहेत. एनडीआरएफ आणि सिव्हिल डिफेन्सचे पथक वायनाडमध्ये उपस्थित असून नौदलाचे एक पथकही तेथे लवकरच पोहोचणार असल्याचे म्हंटले जात आहे. एअर फोर्सचे दोन हॅलिकॉप्टर्स MI-17 आणि ALH रेस्क्यू मिशनसाठी तैनात आहेत. पण मुसळधार पाऊस सुरु असल्याने त्यांना उड्डाण करण शक्य होत नाहीय.
पीएम मोदींनी जाहीर केली मदत
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी X वर पोस्ट शेअर करत म्हंटल आहे, “मी त्या सर्वांसोबत आहेत ज्यांनी प्रियजन गमावले आहेत आणि तसेच जे जखमी झाले आहेत. मी त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो. प्रभावित लोकांना वाचवण्यासाठी मदतकार्य सुरु आहे. केरळचे मुख्यमंत्री श्री पिनाराई विजयन यांच्याशी मी बोललो आहे. केंद्र सरकार सर्व सहकार्य करेल” तसेच पंतप्रधानांनी घोषणा केली की, भूस्खलनात मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबीयांच्या नातवेईकांना 2 लाख रुपये रुपयांची मदत केली जाईल आणि जखमींना 50 हजार रुपये देण्यात येईल.