अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतात सोमवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाचा प्रभाव लॉस एंजेलिसपर्यंत दिसत होता. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 4.9 नोंदवण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू बारस्टो जवळ असल्याचे सांगण्यात येत आहे. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनुसार स्थानिक वेळेनुसार दुपारी एकच्या सुमारास भूकंपाची सुरुवात झाली. त्याचे केंद्र जमिनीपासून पाच मैल खाली होते. सॅन बर्नार्डिगो काउंटीशिवाय लॉस एंजेलिस, केर्न, रिव्हरसाइड आणि ऑरेंज काउंटीमध्ये भूकंपाचा प्रभाव दिसून आला. या ठिकाणी भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.5 आणि 2.7 इतकी मोजली गेली.