Kerala Landslide News : केरळमधील वायनाड या जिल्ह्यात मंगळवारी भूस्खलनाची भीषण घटना घडली आहे. या घटनेत आतापर्यंत अनेकांनी आपले जीव गमावले आहेत, तर अनेकजण आणखीनही मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही घटना मंगळवारी सकाळी मेप्पाडी जवळ घडली. सध्या केरळमध्ये पावसाने थैमान घातले आहे. याच पावसामुळे मेप्पाडी भागातील डोंगराळ भागात भूस्खलन झाले आहे.
आतापर्यंत वायनाड भूस्खलनात मृतांची संख्या 151 वर पोहोचली आहे. भारतीय लष्कराच्या जवानांनी चुरलमालामध्ये बचावकार्य सुरू केले आहे. येथे लष्कराच्या चार तुकड्या बचाव कार्यात गुंतल्या आहेत. एनडीआरएफच्या टीमही लोकांना वाचवण्यासाठी काम करत आहेत.
दरम्यान, हवामान खात्याने केरळमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वार्तावली आहे. हवामान विभागाने
केरळमधील पठाणमथिट्टा, अलाप्पुझा, कोट्टायम आणि एर्नाकुलम जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. वायनाड, कोझिकोड, कन्नूर आणि कासरगोड जिल्ह्यातही येत्या तीन तासांत मुसळधार पाऊस पडणार आहे.