आज काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली. काँग्रेस पक्षाची संसदीय दलाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली. यावेळी सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. जनगणना करण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी केली आहे. जनगणना न झाल्यास देशाच्या लोकसंख्येचा अंदाज येणार नाही.
राजधानी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सोनिया गांधी म्हणाल्या, ”जनगणना करण्याचा कोणताही हेतू या सरकारचा नाहीये हे स्पष्ट असल्याचे दिसत आहे. जनगणना न झाल्यास आपल्या देशातील जनसंख्या विशेष करून अनुसूचित जाती आणि जमातींची लोकसंख्या आपल्याला कळू शकणार नाही. जनगणना न झाल्यामुळे पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा फायदा कोट्यवधी नागरिकांना फायदा मिळू शकणार नाही.”
सोनिया गांधी यांनी सीपीपीच्या बैठकीत आपल्या भाषणात वायनाड भूस्खलन आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे प्रभावित झालेल्या कुटुंबांबद्दल शोक व्यक्त केला. 2024-25 च्या अर्थसंकल्पाविषयी बोलताना, सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर आर्थिक आणि सामाजिक आव्हाने हाताळल्याबद्दल, विशेषतः शेतकरी आणि तरुणांशी संबंधित असल्याची टीका केली.
सोनिया गांधी यांनी पीएम मोदींच्या सरकारमधील शिक्षण व्यवस्थेवरही टीका केली आणि स्पर्धा परीक्षांमधील त्रुटींचा दावा केला. त्या म्हणाल्या की या समस्यांमुळे अनेक तरुणांच्या आशा धुळीला मिळाल्या आहेत आणि NCERT, UGC आणि UPSC सारख्या संस्थांच्या अखंडतेला हानी पोहोचली आहे.