राज्यात आगामी काळात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. दरम्यान या निवडणुकांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीने तयारी सुरू केली आहे. महायुतीमध्ये सध्या भाजपा हा मोठा पक्ष आहे. त्यात महाराष्ट्र भाजपचे नेतृत्व हे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख चेहरा असणारे देवेंद्र फडणवीस यांची आता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून मोठी जवाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. फडणवीसांना कायमस्वरूपी दिल्लीत बोलावले जाण्याची शक्यता आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी देवेंद्र फडणवीसांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपुष्ठात आला आहे. तसेच त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद रिक्त आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला. त्यात भाजपाला देखील अनेक जागांवर पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर राज्याचे भाजपचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांनी या पराभवाची जवाबदारी स्वीकारत मला सरकारमधून मुक्त करून संघटनेत काम करू द्यावे अशी विनंती केंद्रीय नेतृत्वाकडे केली होती. मात्र त्यावर नेतृत्वाने याचा निर्णय नंतर करू असे सांगितले होते.
देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा रंगू लागली आहे. याला कारण म्हणजे काही दिवसांपूर्वच फडणवीसांनी कुटुंबियांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. तसेच देवेंद्र फडणवीस यांचे नाव राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सर्वात आघाडीवर आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देखील पाठिंबा असल्याच्या चर्चा सुरू आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या अतिशय चांगले संबंध आहेत. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी देखील जवळचे संबंध असल्याचे फडणवीसांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने आधी दिलेल्या नावांना संघाने पाठिंबा दिला न नसल्याचे देखील समजते आहे. त्यामुळे फडणवीसच या पदासाठी प्रबळ दावेदार समजले जात आहे.