Ladli Behna Yojana 2024 : महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी नुकतीच महाराष्ट्र्र सरकारने लाडली बहीण योजनेची घोषणा केली. 2024-25 चे अर्थसंकल्प 28 जून रोजी महाराष्ट्र विधानसभेत सादर करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडली बहीण योजना सुरू करण्याची घोषणा केली.
या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 दिले जाणार आहेत. या योजनेमागचा उद्देश महिलांना आवश्यक आर्थिक सहाय्य देऊन स्वावलंबनाला चालना देणे हा आहे.
लाडली बेहना योजनेसाठी सरकारने 46,000 कोटी रुपयांच्या बजेटची तरतूद केली आहे. पात्र महिला या योजनेसाठी अर्ज करून याचा लाभ घेऊ शकतात. या योजनेसाठी फॉर्म भरण्याची सुरुवात १ जुलैपासून सुरु झाली असून, यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट अशी आहे. या योजने अंतर्गत महिलांच्या खात्यात 19 ऑगस्टला पैसे जमा होणार आहेत, नुकतीच अजित पवार यांनी याची घोषणा केली होती, रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार आहेत.
यातच आता या योजनेबाबत आणखी एक महत्वाचे अपडेट समोर येत आहे. या योजनेअंतर्गत प्रथम महिलांच्या खात्यात एक रुपया होणार असल्याची माहिती मिळते आहे. काय आहे नेमका हा प्रकार जाणून घेऊया.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत महिला व बालविकास विभागाकडे १ कोटी हून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. पात्र अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर काही निवडक अर्जदार महिलांच्या बँक खात्यात १ रुपया जमा… pic.twitter.com/ZaulXzk2uz
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) July 31, 2024
महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी X या सोशल मीडिया हँडलवरुन एक व्हिडीओ ट्वीट करण्यात आला आहे. या ट्वीटमध्ये बोलताना त्या म्हणाल्या की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेंतर्गत खूप अर्ज येत आहेत. पात्र अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करणं, हे आमच्यासाठी निश्चितपणानं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही प्रायोगित तत्त्वावर काही निवडक अर्जदारांच्या बँक खात्यांत प्रत्येकी एक रुपया जमा करत आहोत. जमा होणारा हा एक रुपया लाभार्थ्यांचा सन्मान निधी नसून फक्त आमच्या तांत्रिक पडताळणी प्रक्रियेचा आवश्यक भाग आहे. ही पडताळणी सुरू झाल्यानंतर पुढची प्रक्रिया आणखी सुरळीत होईल. अर्जदार माता-भगिनींना आमची विनंती आहे की, हा आमचा तांत्रिक प्रक्रियेचा एक भाग असून याबाबतचा कोणत्याही प्रकारचा गैरसमज किंवा कोणत्या प्रकारच्या अपप्रचाराला बळी पडू नका.” असे आवाहन केले आहे.