महाविकास आघाडीने तयारी सुरू केली आहे. महायुतीमध्ये सध्या भाजपा हा मोठा पक्ष आहे. त्यात महाराष्ट्र भाजपचे नेतृत्व हे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख चेहरा असणारे देवेंद्र फडणवीस यांची आता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून मोठी जवाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. फडणवीसांना कायमस्वरूपी दिल्लीत बोलावले जाण्याची शक्यता आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी देवेंद्र फडणवीसांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. यावर मंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
चंद्रकांत पाटील हे पुण्यात माध्यमांशी संवाद साधत होते. सध्या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या नावासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. देवेंद्र फडणवीस जर का राष्ट्रीय अध्यक्ष झाले तर आम्हाला सर्वाना आनंद होईल. राष्ट्रीय अध्यक्ष होण्यासाठी त्यांच्यात सर्व गुण आहेत असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. त्यामुळे आता खरोखर देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रीय अध्यक्ष होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा रंगू लागली आहे. याला कारण म्हणजे काही दिवसांपूर्वच फडणवीसांनी कुटुंबियांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. तसेच देवेंद्र फडणवीस यांचे नाव राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सर्वात आघाडीवर आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देखील पाठिंबा असल्याच्या चर्चा सुरू आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या अतिशय चांगले संबंध आहेत. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी देखील जवळचे संबंध असल्याचे फडणवीसांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने आधी दिलेल्या नावांना संघाने पाठिंबा दिला न नसल्याचे देखील समजते आहे. त्यामुळे फडणवीसच या पदासाठी प्रबळ दावेदार समजले जात आहे.