दिल्लीतील शाळांना पुन्हा एकदा बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. दक्षिण दिल्लीतील पूर्व कैलासच्या समर फील्ड स्कूलला ही धमकी मिळाली आहे. हे काल रात्री शाळेला ईमेलवर पाठवण्यात आले, त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि शाळा रिकामी करण्यात आली.बॉम्बची माहिती मिळाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी सुरक्षेसाठी शाळा रिकामी केली आहे. याची माहिती तातडीने रुग्णवाहिका आणि बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाला देण्यात आली. पथकांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला मात्र यावेळी पोलिस आणि बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाला शाळेत काहीही आढळून आले नाही.
या वेळी समर फिल्ड्स शाळेच्या प्राचार्या शालिनी अग्रवाल यांनी सांगितले की, त्यांना रात्री उशिरा शाळेत बॉम्ब असल्याची ईमेल प्राप्त झाला होता. त्यावर कारवाई करत संपूर्ण शाळेची तपासणी करण्यात आली. अवघ्या 10 मिनिटांत शाळा रिकामी करून पोलिसांना याबाबत कळवण्यात आल्याचे मुख्याध्यापकांच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, त्यांच्या हाकेवर सर्वजण घटनास्थळी पोहोचले आणि तपासात सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांनी पोलीस आणि बॉम्ब निकामी पथकाचेही आभार व्यक्त केले. मुलांच्या पालकांचेही सहकार्य लाभले.
दिल्लीतील एका रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याचे वृत्त समोर आले होते. दिल्लीतील गांधी नगर भागात असलेल्या चाचा नेहरू हॉस्पिटलच्या आवारात बॉम्ब असल्याची माहिती ईमेलद्वारे प्राप्त झाली होती. त्यानंतर पीसीआरला कॉल करण्यात आला होता. याची माहिती दिल्ली पोलिसांना देण्यात आली, त्यामुळे रुग्णालय प्रशासन आणि स्थानिक पोलिसांनी खबरदारीचा म्हणून रुग्णालयाचा परिसर रिकामा केला.
पोलिसांनी रुग्णालयाच्या आत आणि बाहेर शोध घेतला परंतु अद्याप काहीही संशयास्पद आढळले नाही. ज्या ईमेलद्वारे हॉस्पिटलला हा मेल पाठवण्यात आला होता, त्या ईमेलच्या आयपी ॲड्रेसचा पोलिस तपास करत आहेत. दरम्यान अशा अफवांचे ईमेल किंवा फोन येण्याचे प्रमाण काही वाढल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका रुग्णालयात देखील अशाच प्रकारे बॉम्ब ठेवल्याची अफवा समोर आली होती. वारंवार असे फेक ईमेल मिळत असल्याने व गर्दीच्या ठिकाणचा उल्लेख असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.