महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि पुणे जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. तसेच राज्यांतील अनेक धरणे भरली असून, अनेक धरणांच्या पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. दरम्यान हवामान विभागाने सांगली आणि कोल्हापूरला अलर्ट जारी केला आहे. सांगली, कोल्हापूरची पुढील ४८ तास महत्वाचे असल्याचे यामध्ये सांगण्यात आले आहे. मुसळधार पावसाचा इशारा या जिल्ह्याना देण्यात आला आहे.
मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पंचगंग नदी देखील धोका पातळीवरून वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राधानगरी, चांदोली आणि कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढत आहे. तीनही द्रहनातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाण्याचा विसर्ग वाढवलाजात आहे. उद्यासाठी सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे कोयना धरण कक्षेत्रात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
जर का कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला तर धरणातून सुरु असलेल्या पाण्याचा विसर्ग वाढविला जाण्याची शक्यता आहे. चांदोली व राधानगरी धरणातून देखील विसर्ग सुरू असल्याने ४८ तास महत्वाचे समजले जात आहेत. सांगलीत कृष्णा नाडीची पाणी पातळी सध्या ४० फुटांवर आहे. कोयनेतून विसर्ग वाढल्याने ही पातळी ४१ ते ४२ फुटांवर जाऊ शकते. सखल भागात राहणाऱ्या व नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच सावधगिरी बाळगून काही जणांचे स्थलांतर देखील करण्यात येत आहे.