राज्यातील भाजपचे नेतृत्व आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला आज भेट दिली आहे. यावेळी त्यांनी रेश्मिबागेत संघाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतत्याचे समजते आहे. यामध्ये विशेष म्हणजे फडणवीसांची गेल्या काही दिवसांमधील ही दुसरी भेट आहे. त्यामुळे या महत्व प्राप्त झाले आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या चर्चेसाठी फडणवीसांचे नाव चर्चेत असताना या भेटीला महत्वाचे मानले जात आहे.
देवेंद्र फडणवीस आणि संघाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये साधारण अर्धा तास भेट झाल्याचे समजते आहे. दरम्यान सध्या सरसंघचालक मोहन भागवत सध्या नागपुरात नसल्याचे कळते आहे. त्यामुळे इतर वरिष्ठ नेत्यांची भेट फडणवीसांनी घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे नाव सध्या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या यादीत आहे. तसेच सरावात जास्त चर्चा ही त्यांच्या नावाचेच आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या राजकारणात राहू इच्छितात. यामागे आगामी विधानसभा निवडणुका हे देखील कारण असू शकते. यासर्व घडामोडींमुळे फडणवीसांच्या आजच्या रेशीमबागेच्या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपुष्ठात आला आहे. तसेच त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद रिक्त आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला. त्यात भाजपाला देखील अनेक जागांवर पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर राज्याचे भाजपचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांनी या पराभवाची जवाबदारी स्वीकारत मला सरकारमधून मुक्त करून संघटनेत काम करू द्यावे अशी विनंती केंद्रीय नेतृत्वाकडे केली होती. मात्र त्यावर नेतृत्वाने याचा निर्णय नंतर करू असे सांगितले होते.
देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा रंगू लागली आहे. याला कारण म्हणजे काही दिवसांपूर्वच फडणवीसांनी कुटुंबियांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. तसेच देवेंद्र फडणवीस यांचे नाव राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सर्वात आघाडीवर आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देखील पाठिंबा असल्याच्या चर्चा सुरू आहेत.