बांगलादेशात आरक्षणाविरोधात सुरू आलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले असून शेख हसीना यांनी काल पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतरही परिस्थिती आणखी बिघडत चालली आहे यानंतर त्यांनी देशही सोडला. ,मात्र हिंसाचाराचे लोण आता देशभरात पसरत असून हसीना शेख यांच्या पक्षाच्या नेत्यांना आता आंदोलकांकडून लक्ष्य करण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर बांगलादेश आता पुढचा पाकिस्तान होणार असल्याचे गंभीर वक्तव्य शेख हसीना यांच्या मुलाने साजिब वाजेद जॉय यांनी केले आहे. ते म्हणाले आहेत की, देशात बदल घडवून आणण्यासाठी शेख हसीना यांनी खूप प्रयत्न केले तरी त्यांच्याविरोधात आंदोलन चालूच आहे. सरकारविरोधातील लोकांच्या टोकाच्या रोषामुळे निराश होऊन त्यांनी पंतप्रधानपद सोडण्याचा निर्णय घेतला. तसेच शेख हसीना कदाचित आता बांगलादेशच्या राजकारणात परतणार नाहीत. हसीना यांनी बांगलादेशला स्थिर आणि चांगले सरकार दिले होते ,बांगलादेशला विकासाच्या मार्गावर नेट त्या दहशतवादाचा मुकाबला करत होत्या. मात्र जमात ए इस्लामी आणि आंदोलकांनी ही वेळ आणली, आणि आता बांगलादेशमध्ये अराजकता आणि आणि हिंसाचार वाढताना दिसत आहे.
मात्र आता या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेख हसीना पुन्हा कधीच बांगलादेश मध्ये परतणार नसल्याचे साजिब जॉय यांनी सांगितले आहे. १५ वर्षे बांगलादेशामध्ये सत्तेत असणाऱ्या हसीना या अत्यंत निराश असून सर्व मेहनत करूनही लोक त्यांच्या विरोधात उठले,” असे साजिब वाजेद जॉय यांनी स्पष्ट केले आहे.आता बांगलादेशला तेच नेतृत्व मिळेल जे त्यांच्या नशिबात असेल असे उद्विग्न विधान त्यांनी केले आहे.
साजिब वाजिद जॉय हे आपल्या कुटुंबासमवेत अमेरिकेत राहतात आता शेख हसीनाही त्यांच्यासोबतच राहतील असे त्यांनी म्हंटले आहे.