बांगलादेशात घडत असलेल्या घटनांच्या धक्कादायक वळणावर बांगलादेश अराजकतेत बुडाला आहे याच राजकीय गोंधळाचा फायदा घेऊन इस्लामी गुंडानी हिंदू समुदायाविरूद्ध दहशत आणि हिंसाचाराची लाट आणली आहे. देशभरातून इस्लामी जमाव हिंदूंच्या घरांवर हल्ले करत आहेत, त्यांना जाळत आहेत आणि अराजकतेच्या भयंकर अवस्थेत महिलांचे अपहरण केले जात आहे अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
शेख हसीना या काल बांगलादेशातून पंतप्रधानपदाचा राजीनामा देत देशाबाहेर रवाना झाल्या त्यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली आहे.आता बांग्लादेशात अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू समाजाला टार्गेट करण्यात येत आहे. निवडून-निवडून हिंदुंवर हल्ले करण्यात येत आहेत. त्यांच्या घर-दुकानांना आगी लावण्यात येत आहेत.. बांग्लादेशातील मेहरपुर येथील इस्कॉन मंदिराचे फोटो समोर आले आहेत. समाजकंटकांनी तोडफोड केल्यानंतर हे मंदिर पेटवून दिले आहे. तसेच काली मंदिरही लक्ष्य करण्यात आले आहे. बांग्लादेशी माीडिय द डेली स्टारच्या रिपोर्टनुसार 27 जिल्ह्यांमध्ये हिंदुंच्या घरांना आणि दुकानांना लक्ष्य करण्यात आले आहे.
ओइक्या परिषदेचे महासचिव मोनिंद्र कुमार नाथ यांच्या सांगण्यानुसार, बांगलादेश मध्ये असा कोणताही जिल्हा शिल्लक नाही की जिथे हिंदुंच्या घरांवर हल्ला झालेला नाही. वेगवेगळ्या जिल्ह्यातून हल्ल्याच्या बातम्या येत आहेत.बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या लाटेत किमान दोन हिंदू नगरसेवकांचा मृत्यू झाला आहे.रंगपूर जिल्ह्यात परशुराम थाना अवामी लीगच्या हरधन रॉय यांची रविवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, असे द डेली स्टारने म्हटले आहे.याच शहरात रविवारी काजल रॉय नावाच्या आणखी एका नगरसेवकाची हत्या झाली, असे द न्यू इंडियन एक्स्प्रेसने म्हटले आहे. तसेच पत्रकार प्रदीप कुमार भौमिक यांची हत्या झाली असल्याची माहितीही समोर आली आहे.
https://x.com/sanjoychakra/status/1820510040765108303
बांगलादेशमध्ये चालू असलेल्या हिंदूंच्या नरसंहाराचे दृश्य सोशल मीडियावरून समोर येत आहे. हिंदू महिलांचे अपहरण करून त्यांना अज्ञात ठिकाणी नेले जात आहे, तर त्यांची घरे लुटली जात आहेत आणि त्यांना जाळण्यात येत आहे. इस्लाम समर्थक हल्लेखोरांना कायद्याची किंवा मानवी जीवनाची पर्वा नाही हे सरळसरळ दिसून येत आहे. अतिशय थंड मनाने ही क्रुरकृत्य केली जात आहेत.
https://x.com/MrSinha_/status/1820506861331796179
बांगलादेशातला हिंदू समुदाय सुरक्षिततेच्या भीतीने जगत असल्याने परिस्थिती समोर आली आहे.याचपार्श्वभूमीवर बांगलादेशातील अल्पसंख्यांकांची सुरक्षा सुनिश्चित करावी, असे मोदी सरकारने बांगलादेशातील नवीन लष्कराला स्पष्ट करावे, असे बांगलादेशातील हिंदूंचे म्हणणे आहे.