महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ चालू केली आहे; मात्र सध्या ‘लव्ह जिहाद’च्या धोक्यामुळे हिंदू युवती आणि महिला अजूनही असुरक्षित आहेत आणि त्यांच्या निर्घृण हत्या सुरूच आहेत. ‘लाडकी बहीण’ योजनेच्या आधी बहिणींना सुरक्षा द्या, बहिणींच्या सुरक्षेसाठी राज्यात तात्काळ ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा करावा, अशी आग्रही मागणी अमरावती येथील राजकमल चौकात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘हिंदु-राष्ट्र जागृती आंदोलना’त करण्यात आली आहे .
उरण येथील २२ वर्षीय यशश्री शिंदे हिची अत्यंत क्रूरतेने आणि मानवतेला काळीमा फासणारी हत्या करण्यात आली. यशश्रीची हत्या करणार्या नराधम आरोपीला तात्काळ भरचौकात फाशी देण्यात यावी, ही मागणीही या वेळी करण्यात आली. हिंदु जनजागृति समितीच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या आंदोलनात हिंदु जनजागृती समितीची रणरागिणी शाखा, सनातन संस्था आदी संघटनांचे कार्यकर्ते तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींसह महिला, युवती आणि धर्मप्रेमी हिंदू सहभागी झाले होते.
याप्रसंगी आंदोलनात सहभागी झालेल्या हिंदूंनी हातात प्रबोधनपर फलक धरले होते आणि घोषणाही देण्यात आल्या. या वेळी शासनाला देण्यात येणार्या निवेदनावर लोकांच्या स्वाक्षर्या घेण्यात आल्या. राज्यात दिवसेंदिवस महिला-मुलींवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तीवर ‘अँटी रोमियो स्कॉड’ सारखी पोलिसांची विशेष शाखा स्थापन करावी, मुसलमान युवक आणि हिंदु युवती यांच्या प्रेमप्रकरणांच्या तक्रारी ‘लव्ह जिहाद’ म्हणून नोंदवल्या जाव्यात, तसेच या प्रकरणांत काही धर्मांध आणि कट्टरतावादी जिहादी संघटना, जिहादी नेते, परकीय शक्ती आढळून आल्यास त्यांची पाळेमुळे खणून काढावीत. त्यांच्यावरही तत्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, आदी मागण्याही या आंदोलनात करण्यात आल्या आहेत. .