आमदार बच्चु कडू यांच्या विरोधात आता हिंदू संघटनांन सह भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली असून बुधवारी ७ ऑगस्ट रोजी अचलपूर तहसील कार्यालयामध्ये भाजपा व हिंदु संघटनांनी धडक देऊन आमदार बच्चु कडू यांच्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी व त्यांनी माफी मागावी अशी मागणी यावेळी अचलपूर तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आली.
दिनांक ५ ऑगस्ट २०२४ रोजी हिंगोली येथे कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांचे नाव न घेता टीका केली टिका करतांना आमदार कडू यांची जीभ घसरल्याचे दिसून आले होते.
“घेतली कावड की निघाला महादेवाला अरे महादेव त्रिशुळ घालील की ढुंगणात” असे म्हणत बच्चू कडू यांनी असंख्य महादेव भक्तांच्या भावन्या दुखावल्या यासह वास्तविक पाहता राजकीय किती की वितृष्ठ असलं तरी धार्मीक भावने बद्दल बोलण्याचे कोणतेही कारण बच्चु कडू यांना नव्हते आणि बच्चु कडू मध्ये तेवढीच मर्दानकी आहे तर दुसऱ्या धर्माच्या देवाचे नाव घेऊन अशा पध्दतीचे वक्तव्य करून दाखवावे असे खोचक वक्तव्य यावेळी भाजपा कडून करण्यात आले आहे.
वैयक्तिक राजकीय स्वार्थासाठी स्वतः हिंदू असतांना आपल्या विरोधकाच्या धार्मिक ठेच पोहोचवण्याचे काम आमदार कडू करत आहात याची किंमत नक्की चुकवावी लागेल असा इशारा यावेळी भाजपा पदधिकऱ्यांनी व हिंदू संघटनेन दिला आहे. बच्चु कडू यांनी केलेल्या वक्तव्याचा भारतीय जनता पार्टी व हिंदू संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला आणि आमदार कडू यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी व कडूंनी माफी मागावी अशी मागणी यावेळी अचलपूर तहसीलदार यांना निवेदनातून केली.
यावेळी भारतीय जनता पार्टी अमरावती जिल्हा ग्रामीणचे कार्यकारणी सदस्य अभय माथने पंचायत राज व ग्रामविकास संयोजक गोपाल तिरमारे डॉक्टर राजेश उभाळ आसरकर सर सुमित निंभोरकर,धर्मराज राऊत, छोटू लाडले,राजन जयस्वाल,विजय मिश्रा, पंडित, गजानन शर्मा, तेजस आजनकर, नंदू राऊत,अरुण निराटकर, संजय सावरकर, विकी सावरकर,मनोज ठाकूर, गणेश समशेर, अनिल बर्वे,वैभव यावल,सारंग नाईक, मंगेश आवणकर,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
बांगलादेश मध्ये झालेल्या हिंदूंच्या अत्याचारावर कायदा तयार करा!
बांगलादेश येथे झालेल्या हिंसाचारात हिंदूंवर झालेल्या अन्याय विरोधात व इस्रायल देशाच्या धर्तीवर भारतात सुद्धा भारताबाहेर राहणाऱ्या हिंदू वर जर अन्याय झाला तो भारतावर अन्याय होईल व भारत त्याच्या विरोधात कारवाई करेल अशा पद्धतीचा कायदा करण्यात यावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे .