Bangladesh crisis : बांगला देशात सुरु असलेल्या हिंसाचामुळे हजरोंच्या संख्येने नागरिक थेट भारत-बांगलादेश सीमेवर येऊन धडकले. यावेळी त्यांनी भारतात घुसणायचा प्रयत्न केला. मात्र, सीमेवर तैनात असलेल्या बीएसएफ जवानांनी नागरिकांना रोखले, आणि जमाव शांत केला. बांगलादेशातील परिस्थिती पाहता भारत सरकारने आधीच सीमेवरीन सैनिक वाढवले होते.
बांगलादेशातील गावकऱ्यांचा एक गट आंतरराष्ट्रीय सीमेजवळ येऊन पोहोचला, त्यानंतर काही काळ गोंधळ झाला. बीएसएफच्या जवानांनी तात्काळ ग्रुपशी संपर्क साधून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. बीएसएफ सध्या हाय अलर्टवर आहे. बांगलादेशात अजूनही तणावपूर्ण परिस्थिती आहे. शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर हिंदू बांगलादेशींवर अत्याचाराचे आरोप होत आहेत.
पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथील भारत-बांगलादेश सीमेवर १ हजाराहून अधिक बांगलादेशी हिंदू पोहोचले आहेत. त्यांना सीमा ओलांडून भारतात यायचे आहे. बीएसएफने भारतात घुसखोरीचे प्रयत्न थांबवले. बीएसएफने त्यांना सातकुरा सीमेवर रोखले आहे. ही घटना जलपाईगुडी जिल्ह्यातील दक्षिण बेरुबारी पंचायतमध्ये घडली.
बुधवारी दुपारी एक हजाराहून अधिक बांगलादेशी, ज्यात बहुतांश हिंदू होते, त्यांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. माहिती मिळताच बीएसएफने तेथे पोहोचून घुसखोरी थांबवली. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जमलेले बांगलादेशी भारतात येण्यास प्रयत्न करत आहेत.
सीमेवर उभे असलेले हिंदू बांगलादेशींवर आरोप करत आहेत की, त्यांची घरे आणि मंदिरे जाळली जात आहेत. त्यांना भारतात आश्रय घ्यायचा आहे. दुसरीकडे, भारतीय लोकांना या गर्दीबद्दल संशय आहे. यामध्ये बांगलादेशी आतंगवादी असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मोठ्या प्रमाणात जमाव आणखीनही सीमेवर आहे. मात्र, बीएसएफ जवानांकडून बांगलादेशी हिंदूंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.
बीएसएफ हाय अलर्टवर
बांगलादेशातील सध्या सुरू असलेले संकट आणि अल्पसंख्याकांवर होणारे कथित हल्ले यादरम्यान, विशेषत: हिंदू भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतील अशी भीती होती. असा प्रयत्न ७ ऑगस्ट रोजी करण्यात आला होता, मात्र उत्तर बंगालच्या काही भागात बीएसएफने तो हाणून पाडला.
7 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी बांगलादेशी नागरिक आंतरराष्ट्रीय सीमेजवळ दोन सेक्टरमध्ये जमताना दिसले. बीएसएफच्या जवानांनी सतर्कता आणि सक्रिय उपाययोजना करून परिस्थितीवर तात्काळ नियंत्रण मिळवले.