Ajit Pawar : येत्या 19 तारखेला ऑगस्टला रक्षाबंधन असून, याच पार्श्ववभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेवर मोठी घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणीला पहिला हप्ता रक्षाबंधनापूर्वीच १७ ऑगस्टला मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
यापूर्वी या योजनेबाबत अपडेट देताना त्यांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने आमच्या माय-माऊलींच्या अकाऊंटला 3 हजार रुपये देणार असल्याचे बोलले होते. म्हणजेच राज्यातील लाडक्या बहिणींना आता रक्षाबंधच्या आधी 3 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे.
काय म्हणाले अजित पवार ?
‘येत्या १९ ऑगस्टला रक्षाबंधन आहे. त्यापूर्वीच १७ ऑगस्ट रोजी जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे नियमात बसणाऱ्या महिलांना मिळतील. असा आमचा प्रयत्न सुरू आहे. हा महिलांचा अधिकार असून महिलांना तो मिळायलाच हवा. महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत येण्यासाठी जनतेने आम्हाला पाठबळ द्यावे. आम्हाला सहकार्य करावे. सरकार आल्यावर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ पूर्ण पुढील ५ वर्षे चालू राहील हे वादा करतो’, असा शब्द त्यांनी महिलांना दिला.
या योजनेअंतर्गत महिलांना दोन महिन्यांचे एकूण ३००० मिळणार असून, महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या अजित पवार जनसन्मान यात्रेवर असून, त्यांना महिलांकडून राखी बांधली जात आहे. अशातच उत्साहाच्या वातावरणामध्ये अजितदादांच्या राज्यातील सर्व ‘लाडक्या बहिणीं’च्या चेहऱ्यावर हसू फुलल्याचं पहायला मिळत आहे.