सनातन धर्मावरील वादग्रस्त वक्तव्यामुळे उदयनिधी स्टॅलिन यांना मोठा झटका बसला आहे. बंगळुरू न्यायालयाने तामिळनाडूचे क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅनिल यांना त्यांच्या सनातनविरोधी विधानावर २१ ऑगस्टपर्यंत आक्षेप नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. ज्यात उदयनिधी स्टॅलिन त्यांनी सनातन धर्म नष्ट करण्याबाबत बोलले होते. याआधी या प्रकरणाची सुनावणी 25 जुलै रोजी झाली होती. त्यावेळी त्यांना एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला होता. याप्रकरणी 8 ऑगस्ट रोजी सुनावणी झाली असून 21 ऑगस्टपर्यंत हरकती नोंदवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
खरे तर गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात चेन्नईतील सनातन निर्मूलन कार्यक्रमात पाहुणे म्हणून स्टॅलिन यांनी समनत धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरियाशी केली होती. ते म्हणाले होते की, अशा काही गोष्टी आहेत ज्या फक्त काढून टाकल्या जाऊ शकतात. सनातन धर्म थांबवता येत नाही तर तो नष्ट झाला पाहिजे. स्टॅलिन यांच्या वक्तव्यानंतर देशभरात त्याचा निषेध करत गुन्हे दाखल करण्यात आले. स्टॅलिन यांच्या वादग्रस्त विधानानंतर उच्च न्यायालयाच्या 14 निवृत्त न्यायमूर्तींसह 262 जणांनी उच्च न्यायालयाला उज्जयनिधी स्टॅलिन यांच्यावर कठोर कारवाई करण्याची विनंती करणारे पत्र लिहिले होते. काही आठवड्यांनंतर, स्टालिन यांच्यावर फौजदारी खटला दाखल करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली.
याशिवाय उदयनिधी स्टॅलिन यांना मंत्रीपदावरून हटवण्याची मागणी मद्रास उच्च न्यायालयात करण्यात आली होती. बेंगळुरू येथील एका ट्रायल कोर्टाने स्टॅलिन यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले होते. फिर्यादीने फौजदारी तक्रार दाखल केल्यानंतर जम्मू न्यायालयानेही तपासाचे आदेश दिले होते. या वर्षी मे 2024 मध्ये अनेक तक्रारदार आणि राज्य सरकारांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये त्यांनी देशाच्या विविध भागांत प्रलंबित असलेले खटले एकत्र करून त्यांच्यावर एकाच एफआयआरच्या स्वरूपात खटला चालवण्याची मागणी केली होती.