व्हॉट्सअॅप आणि ईमेल हॅक होण्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. सरकारी अधिकाऱ्यांचीही खाती हॅक झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. आता खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन आणि व्हॉट्सअॅप हॅक झाल्याचे समोर आले आहे.
सुळे यांनी स्वतःच एक्स या समाजमाध्यमाद्वारे सर्वाना ही माहिती दिली आहे . माझा फोन आणि व्हॉट्सअॅप हॅक झाला आहे. कोणीही मला मेसेज करू नये. या बाबत मी पोलीस तक्रार करत आहे. कृपया याची नोंद घ्यावी, असे सुळे यांनी नमूद केले आहे. मी कोणावरही आरोप केलेले नाहीत. माझा फोन कोणी हॅक केला मला माहिती नाही. यांच्याशी कोण गप्पा मारतंय हे देखील मला माहिती नाही. माझा फोन हॅक झाला असेल तरी त्या फोनमध्ये लपवण्यासारखे काहीही नाही. पण फक्त माझ्या नवऱ्याला कृपया काही चुकीचे मेसेज पाठवू नका, एवढीच त्या हॅकरला विनंती आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. .
सुळे यांच्यासारख्या खासदाराचा फोन आणि व्हॉट्सअॅप हॅक झाल्याच्या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.सुप्रिया सुळे या शिवस्वराज्य यात्रेत सहभागी झाल्या आहेत. आज राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा पुण्यातील दौंड भागात होती. याच वेळेला सुप्रिया सुळेंचा मोबाईल हॅक झाल्याचे लक्षात आले , त्या म्हणाल्या की, या ठिकाणी आल्यावर माझं व्हॉट्सअॅपच सुरु होत नव्हते. मी जयंत पाटील यांनी मला नमस्कार मेसेज करा असे सांगितले.
त्यांनी तो मेसेज केल्यानंतर मी फोनवर काहीही न करता त्यांना समोरुन नमस्कार असा मेसेज आला. यानंतर मी माझा फोन बंद केला. मी पुन्हा दोन, तीन जणांना माझ्या फोनवर मेसेज करण्यास सांगितले. त्यांनाही समोरुन मेसेज आला. आता माझा फोन बंद आहे. मी सिमकार्ड काढले आहे.