Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

मनसैनिकांच्या ‘खळखट्याक’वर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका, म्हणाले, “जशास तसे नाही तर…”

Renuka Pawar by Renuka Pawar
Aug 11, 2024, 05:50 pm GMT+0530
social media

social media

FacebookTwitterWhatsAppTelegram

Raj Thackeray VS Uddhav Thackeray : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे, तसेच अनेक नेते महाराष्ट्र्र दौऱ्यावर आहेत, तर काही नेते दिल्लीला भेट देत आहेत, अशातच दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील दोन मोठ्या नेत्यांमध्ये वाद दिसून आला, नेमके काय आहे प्रकरण? जाणून घेऊया…

दोन दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बीड दौऱ्यात उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकल्या होत्या. या घटनेनंतर काल राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत ‘माझ्या नादी लागू नका, अन्यथा राज्यात एकही सभा घेऊ देणार नाही’, असा थेट इशारा उद्धव ठाकरे व शरद पवारांना दिला होता.

यानंतर आक्रमक मनसे कार्यकर्त्यांनी शनिवारी रात्री ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर शेणाचे गोळे, नारळ, टोमॅटो तसेच बांगड्याही फेकण्यात आल्या. काही जणांनी दगड फेकण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये धरपकडही झाली. या प्रकरणानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. यावर आता स्वतः राज ठाकरे यांनी सोशल मीडिया साईट X वर पोस्ट शेअर करत आपली भूमीला स्पष्ट केली आहे तसेच विरोधकांना थेट इशाराही दिला आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

काल ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या वाहन ताफ्यासमोर माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जी निदर्शनं केली, ती संतापातून आलेली प्रतिक्रिया होती.

माझ्या नवनिर्माण यात्रेच्या दरम्यान जी काही विघ्न उभी करण्याचे प्रयत्न धाराशिवपासून सुरु झाले. धाराशिवमध्ये निदर्शनाला आलेले, दाखवायला मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या नावाखाली घोषणा देत होते. पण पुढे लक्षात आले की त्यांचा या आंदोलनाशी काहीच संबंध नव्हता.

ते तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटांशी संबंधित होते. आणि या सगळ्या गोष्टी सोशल मीडियातून उघड्या पडल्या.

बीडमध्ये तर उघडपणे उबाठा शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाने निदर्शनाच्या नावाखाली फार्स केला आणि त्यावर कुठेही निषेधाचा सूर लवकर न उमटल्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जे केलं ते केलं. या संपूर्ण काळात महाराष्ट्र सैनिक ज्या पद्धतीने सावध राहिला तसं त्याने यापुढे देखील रहावं.

मी कालच्या पत्रकार परिषदेत पण सांगितलं होतं की माझ्या नादाला लागू नका कारण माझा महाराष्ट्र सैनिक काय करेल हे तुम्हाला कळणार नाही. आणि ज्याची प्रचिती कालच आली.

मुळात आपण महाराष्ट्रात आहोत, हे भान एकूणच राजकीय व्यवस्थेचं कमी होऊ लागलं आहे. राजकारण म्हणलं की मुद्यांची लढाई आलीच. एकमेकांवर शाब्दिक तिखट वार हे देखील होणार. पण म्हणून कोणीही उठून, कोणाहीबद्दल काहीही बोलावं आणि कुठल्याही थराला जाऊन दौऱ्यामधे विध्न निर्माण करण आणि टीआरपी मिळतोय किंवा काहीतरी बातम्यांचे गुऱ्हाळ चालवायला बातमी मिळत आहे, म्हणून अशा थोबाड उचकटणाऱ्याना, माध्यमांनी पण उचकवणं थांबवलं पाहिजे. या सगळ्यातून महाराष्ट्रात तणाव वाढेल अशी कोणीतही परिस्थिती निर्माण होऊ देऊ नका.

माझ्या पक्षात तर आपल्यापेक्षा मोठ्या नेत्यांच्या बाबतीत हे असले प्रकार, अगदी पक्ष स्थापनेपासून महाराष्ट्र सैनिकांनी कधी केले नाहीत आणि चुकून त्यांनी केले तरी ते मी खपवून घेणार नाही याची त्यांना पण जाणीव आहे.

आणि लोकं हे पण म्हणतील तुम्ही मुद्द्याचं बोलताय, तुम्ही गुद्दे पण देताच की… हो आम्ही देतो गुद्दे….

महाराष्ट्रातील असंख्य प्रश्नांसाठी, माता, भगिनींसाठी आम्ही याआधी गुद्दे दिलेत आणि यापुढे देऊ. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सत्तेत येऊन लोकांचे प्रश्न सोडवायचेत आणि त्यासाठी वेळेस दोन ठोसे हाणायची वेळ आली तर ते पण करूया. कारण ती शक्ती लोकांसांठी वापरली जाणार आहे. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी असल्या सुमार लोकांसाठी तुमची शक्ती वाया घालवू नका.

फक्त ‘जशास तसे’ नाही तर, ‘जशास दुप्पट तसे’ उत्तर देणं म्हणजे काय असतं याची चुणूक काल तुम्ही दाखवलीत, ती पुरेशी आहे. त्यामुळे तुम्ही सगळं हे थांबवा असं माझं, माझ्या महाराष्ट्र सैनिकांना आवाहन आहे.

महाराष्ट्राची राजकीय परिपक्वता, राजकीय मतभेद झाले तरी मनभेद होऊ द्यायचे नाहीत, ही संस्कृती किमान आपल्याकडून पुसली जाणार नाही हे आपण पाहूया. पण हे करताना तुमच्या नावावर खपवून, परस्पर पक्षाला बदनाम करण्याचे प्रकार कुठे घडत नाहीयेत ना याकडे पण लक्ष ठेवा. महाराष्ट्रात शांतता नांदेल, इथल्या निवडणुका शांततेत पार पडतील हे किमान आपण तरी नक्की पाहूया. आणि तरीही नतद्रष्ट सुधारणार नसतील, तर त्यांचं काय करायचं ते नंतर पाहू.

यांत काही मोजके पत्रकार, त्यांच्या हातातील वर्तमानपत्र असो की एखादं चॅनेल, याचा उपयोग लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शस्त्र म्हणून वापरायचं सोडून, स्वतःच्या फायद्यासाठी त्याचा हत्यार म्हणून वापर करत आहेत हे उघड झालं.

समाजात कसा द्वेष पसरवता येईल, एखाद्याचं प्रतिमाहनन कसं होईल हे पाहत आहेत. तुम्ही ते आर्थिक लाभासाठी करताय की अजून कशासाठी करताय, याच्याशी मला देणंघेणं नाही. मूठभर राजकीय नेते आणि मूठभर पत्रकार यांचे आर्थिक हितसंबंध त्यांना लखलाभ. पण जे तुम्ही करताय ते दुधारी शस्त्र आहे आणि त्यातून जो वणवा पेटतोय त्यात तुम्हीच खाक व्हाल हे विसरू नका.

जाता जाता इतकंच सांगतो की, या राज ठाकरेच्या आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांच्या नादी लागू नका. मी मागे पण बोललो आहे, काल पण बोललो आहे, तुम्ही प्रस्थापित असाल पण विस्थापितांची शक्ती माझ्या पाठीशी उभी आहे हे विसरू नका. हे तुमच्या काळजीपोटी सांगतोय असं समजा.

Tags: Amns newsMAHARASHTRraj thackerayuddhav thackeray
ShareTweetSendShare

Related News

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार
राज्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE
राज्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?
कायदा

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.