आठवड्यातून पाच दिवस शेअर बाजारात व्यवहार होत असतात. यात गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. शेअर मार्केट शनिवार व रविवारी बंद असते . मात्र आता शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.या आठवड्यात शेअर मार्केटला तीन दिवसांची सुट्टी असणार आहे. शनिवार आणि रविवारच्या सुट्टीशिवाय या आठवड्यात आणखी एक दिवस बाजार बंद असणार आहे.
ऑगस्ट महिना हा सणांचा महिना असतो. त्यामुळे विविध सण या महिन्यात येतात. अशातच या आठवड्यात स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीमुळे बँका तसेच शेअर बाजारातही सुट्टी असणार आहे.
या आठवड्यात गुरूवारी संपूर्ण देशात स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे.१५ ऑगस्टला संपूर्ण देशात या राष्ट्रीय पर्वाच्या निमित्ताने सुट्टी असेल. बँका आणि शाळांसोबत शेअर मार्केटही बंद असेल.
स्वातंत्र्यदिनासोबतच शेअर बाजाराला १७ आणि १८ ऑगस्टला शनिवार, रविवार असल्याने शेअर बाजार सलग तीन दिवस बंद असणार आहे.
शेअर बाजार देशातले सर्व प्रमुख सण किंवा काही खास कारणांमुळे बंद असतो. यावेळी शेअर बाजार बंद असताना इक्विटी, इक्विटी डेरिव्हेटिव्ह, एसएलबी, करन्सी डेरिव्हेटिव्ह आणि इंटरेस्ट डेरिव्हेटिव्हजमध्ये कोणतेही व्यवहार होत नाहीत.
ऑगस्टनंतरच्या महिन्यांमध्ये शेअर बाजार शनिवार, रविवारव्यतिरिक्त या दिवशी असणार बंद
15 ऑगस्ट : स्वातंत्र्यदिन
2 ऑक्टोबर : महात्मा गांधी जयंती
1 नोव्हेंबर : दिवाळी-लक्ष्मीपूजन
15 नोव्हेंबर: गुरुनानक जयंती
25 डिसेंबर: ख्रिसमस