उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा ही सोमवारी सकाळी मालेगाव मध्ये दाखल झाली यानंतर त्यांनी या ठिकाणी जनसभेला संबोधित करताना ते म्हणाले की वफ्फ बोर्ड संदर्भामध्ये जर चुकीचा निर्णय होत असेल तर त्याबाबत केंद्र सरकार विरोधात आपणही आंदोलन करू असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे. तसेच यादरम्यान त्यांनी मुस्लिम बहुल नेतृत्व असलेल्या माजी आमदार असिफ शेख यांना आपल्या पक्षांमध्ये येण्यासाठी त्यांची भेट देऊन चर्चा देखील केली.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सुरू असलेली जनसमान यात्रा ही शिर्डीनंतर आता मालेगाव मध्ये दाखल झाली ही यात्रा घेऊन अजित पवार हे रविवारी रात्री नाशिक मध्ये दाखल झाले या ठिकाणी मुक्काम केल्यानंतर त्यांनी सकाळी सात वाजता नाशिक वरून मालेगाव कडे रवाना झाले त्यानंतर ते मालेगाव मध्ये गेल्यावर त्यांनी सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सोडती दिलेले माजी आमदार आणि मुस्लिम बहुगुणी नेतृत्व असलेले आसिफ शेख यांची त्यांनी भेट घेतली आणि त्यांच्याशी त्यांनी सुमारे वीस मिनिटे चर्चा केली आणि त्यांना आपल्या पक्षांमध्ये सहभागी होण्यासंदर्भामध्ये आमंत्रण दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसमान यात्रेला संबोधित केले यावेळी त्यांच्या समावेत राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष रवींद्र पवार नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे व इतर मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते
संबोधित करताना अजित पवार म्हणाले की विरोधक जो प्रचार करत आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 17 तारखेलाच पैशाचा वाटप केले जाणार आहे यामध्ये कोणी कितीही अपप्रचार केला तरी त्यावर विश्वास ठेवू नका असे आवाहन करून अजित पवार पुढे म्हणाले की, महायुतीने विकासाचे राजकारण केले आहे परंतु हे राजकारण विरोधकांना बघवत नाही म्हणून ते आरोप करीत असल्याचा आरोपच त्यांनी विरोधकांवर केला आहे.
यावेळी बोलताना अजित पवार पुढे म्हणाले की जर केंद्र सरकारकडून वक्फ बोर्ड बाबत चुकीचा निर्णय घेतला जात असेल त्याबाबत आपणही आंदोलन करू आपणही याबाबत चंद्रबाबू नायडू व व नितीश कुमार यांच्याशी सल्लामसलत करून त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासंदर्भामध्ये निर्णय घेऊ असे मोठे विधान पवारांनी यावेळी केले आहे. आता या नंतर राजकीय वर्तुळात अजित पवार यांच्या या सरकार विरोधातल्या वक्तव्याबद्दल चर्चा ऐकू येत आहे.