Ladki Bahin Yojna : राज्यात सध्या लाडकी बहीण योजनेची हवा आहे. सत्ताधारी या योजनेला घेऊन वातावरण तापवत आहेत, तर विरोधी नेते या योजनेवर सडकून टीका करत आहेत, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेव्हापासून या योजनेची घोषणा केली तेव्हापासून या योजनेची चर्चा सुरु आहे. यातच आता आमदार रवी राणा यांनी याबात एक धक्कादायक विधान केले आहे, ज्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
नेमके काय म्हणाले रवी राणा?
विधानसभेसाठी तुमचे आशीर्वाद हवे आहेत. आमचे सरकार आले तर तुम्हाला देण्यात येणारे पैसे दीड हजारवरून तीन हजार करू. पण, ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही त्यांच्या खात्यातून दीड हजार रुपये काढून घेऊ. तुमचा भाऊ म्हणून मी हे सांगत आहे, असं राणा म्हणाले आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे प्रमाणपत्र वितरण सोहळा अमरावती येथे रणी राणा यांनी घेतला होता. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमावेळी अनेक महिला उपस्थित होत्या. यावेळी बोलताना रवी राणा म्हणाले की, ‘ज्याचं खाल्लं त्यांचं जागलं पाहिजे. सरकार देत आहे, पण त्यांना आर्शीवादही मिळायला हवा.’ रवी राणा यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगले तापणार असलयाचे चित्र दिसत आहे.