Saturday, June 7, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home इतिहास,संस्कृती

हिंदू जीवनपद्धती आणि जीवनदृष्टीचे प्राचीन काळापासून मनुष्यजातीला योगदान : सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे

Rupali Gowande by Rupali Gowande
Aug 12, 2024, 05:45 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

हिंदू स्वयंसेवक संघाच्या (एचएसएस) विश्व कार्यकर्ता विकास वर्ग -1 या प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे बंगलुरु येथील जनसेवा विद्या केंद्रात समापन झाले. या गतिमान अभ्यासक्रमात 19 देशांतील 200 समर्पित शिक्षार्थी सहभागी झाले. यात अमेरिका, इंग्लंड, जपान, न्यूझीलंड आणि युरोपमधील स्वयंसेवकांचा समावेश होता. या वर्गात बौद्धिक आणि शारीरिक प्रशिक्षणाचा संगम झाला होता. त्यात हिंदू जीवनपद्धतीच्या समृद्ध वारसा आणि शिस्तीचे प्रदर्शन झाले.

घोष पथकाच्या वतीने सादर करण्यात आलेली अप्रतिम सिम्फनी हे या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. बासरी आणि ट्रंपेट यासारख्या अभिजात भारतीय वाद्यांचा क्लॅरोनेट व सॅक्सोफोन यांसारख्या पाश्चात्य वाद्यांशी मेळ घालण्यात आला. पूर्व आणि पश्चिमेच्या या मिलाफामुळे सर्व उपस्थितांना एका भारावून टाकणारा सांगितिक अनुभव मिळाला.

यावेळी स्वयंसेवकांनी योगासनांच्या माध्यमातून आपली शारीरिक क्षमता प्रदर्शित केली. सूर्यनमस्कारांसह त्यांनी मनोहारी रचना सादर केल्या. त्यानंतर शिस्त आणि एकतेचे प्रदर्शन घडविणाऱ्या समता प्रात्यक्षिके झाली. यावेळी सेविका गणांनी आत्मरक्षणाची प्राचीन कला असलेल्या नियुद्ध या प्रकारातील आपले नैपुण्य दाखविले. त्यानंतर लेझीम प्रात्यक्षिकातून त्यांनी चपळता व समन्वय यांचे प्रदर्शन घडविले. स्वयंसेवक आणि सेविका या दोघांनी एकत्र येऊन लाठीचा पारंपारिक दंड व्यायाम सादर केला. त्याद्वारे त्यांनी आपल्या गटाचे सामर्थ्य व एकता प्रदर्शित केली.

अभ्यासक्रमाच्या समारोप समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध संगीतकार आणि संयुक्त राष्ट्रसंघाचे सदिच्छा दूत रिकी केज, रा. स्व. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे, स्वदेशी जागरण मंचाचे राष्ट्रीय समन्वयक प्रा. भगवती प्रकाश आणि हिंदू स्वयंसेवक संघ, न्यूझीलंडच्या अनुपमा चिट्टी उपस्थित होते.

मार्गदर्शनपर संबोधनात, मा. दत्तात्रेय होसबाळे यांनी जगभरात हिंदूंची वस्ती असल्याचे अधोरेखित करून 150 पेक्षा जास्त देशांमध्ये एक अब्जापेक्षा जास्त हिंदू राहत असल्याचे नमूद केले. हिंदू संघटनांनी समाजात सकारात्मक बदल करण्याची गरज असल्याचे सांगून, ते म्हणाले की हिंदू जीवनपद्धतीकडे सर्वसाधारणपणे सन्मानाने पाहिले जाते. या जीवनपद्धतीने जागतिक संस्कृतीला, विशेषतः संगीताच्या माध्यमातून, मोठे योगदान दिले आहे. हिंदू हे कायदा पाळणारे आणि शांतताप्रेमी नागरिक असल्याचा गौरव करून होसबाळे म्हणाले की, हिंदू ज्या देशात जातात त्या देशाचा आदर करतात आणि तिथे कधीही ते ओझे ठरत नाहीत. जगभरात या मूल्यांचा प्रचार करण्यासाठी हिंदू स्वयंसेवक संघाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. पर्यावरणाचे प्रश्न तसेच सामाजिक मुद्द्यांसारख्या आव्हानांचे निराकरण हिंदू जीवनपद्धतीच्या तत्त्वांद्वारे परिणामकारकपणे करता येऊ शकते, यावर त्यांनी भर दिला. तसेच परदेशातील हिंदूंच्या वतीने स्थानिक समुदायासाठी सेवेचे उपक्रम राबविण्याच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. यासाठी हिंदू स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून एक सहयोगी जाळे उभे राहिले असल्याचे त्यांनी सांगितले.

संबोधनात संयुक्त राष्ट्रसंघाचे सदिच्छा दूत श्री. रिकी केज यांनी आपल्या जीवनावर वडिलांचा मोठा प्रभाव असल्याचे सांगितले. आपले वडील डॉक्टर होते आणि म्यानमारमध्ये असताना महाविद्यालयीन जीवनात ते संघाशी जोडले गेले होते. ते आपल्यासाठी प्रेरणा देणारे ठरले, असे त्यांनी सांगितले. भारतातील तसेच परदेशात राहणाऱ्या भारतवंशीय नागरिकांनी भारतीय शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून आपल्या मुलांशी पुन्हा जोडून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. पर्यावरणाच्या संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करून साधी जीवनशैली आणि कचरा कमी करणे ही पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने अत्यावश्यक पावले आहेत, असे ते म्हणाले. सांस्कृतिक ठेव्याचे जतन आणि शाश्वत जीवन पद्धती यांच्यात संतुलन साधण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

अभ्यासक्रम 26 जुलै ते 11 ऑगस्ट या दरम्यान पार पडला. यात एकात्म मानववाद, संघ विचार आणि समाज विचार अशा विषयावर सखोल चर्चा करण्यात आली. तसेच सरसंघचालक श्री. मोहन भागवत जी, डॉ. मनमोहन वैद्य आणि सेविका प्रमुख शांताक्का यांसारख्या मान्यवरांनी या वर्गाला भेट दिली.

या वर्गात डेटा सायंटिस्ट, उद्योजक आणि शिक्षक इत्यादी सहभागी झाले होते. त्यांनी हा समृद्ध करणारा अनुभव असल्याचे सांगितले. न्युझीलंडमधील एका सहभागीने हा वर्ग हा आपल्या जीवनात परिवर्तन घडवून आणणारा अनुभव असल्याचे सांगितले. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथील एका सहभागीने उत्तम निवास व्यवस्था तसेच मातृभोजनाच्या हृदयंगम अनुभवाचे वर्णन केले.
हिंदू स्वयंसेवक संघाचे कार्य पुढे नेण्याची स्वयंसेवक आणि सेविकांनी पुन्हा कटिबद्धता व्यक्त करून विश्व कार्यकर्ता विकास वर्गाची सांगता झाली. सेवा आणि एकता या मूल्यांचे रक्षण करणाऱ्या एका जागतिक हिंदू समुदायाला त्यामुळे चालना मिळाली.

Tags: banglurudattatrey hosabaleHindu swaiyasevak sanghRashtriya Swayamsevak Sangh
ShareTweetSendShare

Related News

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

हजरत इब्राहिम यांचा संदेश आणि आजची बकरी ईद, सुसंगती की विसंगती?
इतिहास,संस्कृती

हजरत इब्राहिम यांचा संदेश आणि आजची बकरी ईद, सुसंगती की विसंगती?

नाशिकच्या सिहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीस सरकारची नियोजनबद्ध तयारी
इतिहास,संस्कृती

नाशिकच्या सिहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीस सरकारची नियोजनबद्ध तयारी

संतांच्या शिकवणीला हरताळ? संत शेख महंम्मद महाराजांच्या समाधी स्थळाच्या वादाचा आढावा
इतिहास,संस्कृती

संतांच्या शिकवणीला हरताळ? संत शेख महंम्मद महाराजांच्या समाधी स्थळाच्या वादाचा आढावा

विठुनामाच्या ओढीला व्यवस्थेची जोड, यंदाची आषाढी वारी का आहे खास?
इतिहास,संस्कृती

विठुनामाच्या ओढीला व्यवस्थेची जोड, यंदाची आषाढी वारी का आहे खास?

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.