युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियाच्या कुर्स्क प्रदेशात युक्रेनियन सैन्याच्या कारवाईची पुष्टी केल्यानंतर, मंगळवारी युक्रेनचे लष्करी कमांडर जनरल ओलेक्सांद्र सिरस्की यांनी दावा केला की त्यांच्या सैन्याने रशियाच्या कुर्स्क प्रदेशातील सुमारे 1,000 चौरस किलोमीटर क्षेत्रावर नियंत्रण मिळवले आहे.
तत्पूर्वी, झेलेन्स्की यांनी टेलिग्रामवरील एका पोस्टमध्ये देशाच्या सैनिक आणि कमांडर्सचे ‘त्यांच्या दृढनिश्चयासाठी आणि निर्णायक कारवाईसाठी’ कौतुक केले. मात्र त्यांनी रशियन हद्दीतील त्याच्या सैन्याच्या कारवायांची अधिक माहिती देणे टाळले. युक्रेन या प्रदेशात मानवतावादी मदत पुरवेल असेही त्यांनी सांगितले. झेलेन्स्की म्हणाले की, सरकारी अधिकाऱ्यांना या क्षेत्रासाठी मानवतावादी योजना तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सोमवारी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्या टेलिग्राम चॅनेलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये कुर्स्क प्रदेशातील नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. असे सांगण्यात आले आहे. ज्यामध्ये लष्करप्रमुखांनी राष्ट्रपतींना या आघाडीवरील परिस्थितीबाबत माहिती दिली आहे. युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्याने या युद्धातील प्रगतीवर सार्वजनिकपणे भाष्य करण्याची ही पहिलीच वेळ आहे.युक्रेनच्या लष्करी कमांडरने म्हटले आहे की त्यांच्या सैन्याने रशियाच्या कुर्स्क प्रदेशातील सुमारे 1,000 चौरस किलोमीटर क्षेत्राचा ताबा घेतला आहे.
जनरल ओलेक्सांद्र सिरस्की यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, ‘सैनिक त्यांचे काम पार पाडत आहेत. संपूर्ण आघाडीवर लढाई सुरू आहे. परिस्थिती आमच्या नियंत्रणात आहे.