अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस आणि डेमोक्रॅट पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारांना कट्टर डाव्या विचारसरणीचे संबोधत म्हटले की अध्यक्षपदी त्या निवडून आल्यास त्या अमेरिकेला उद्ध्वस्त करतील. टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क यांच्याशी दोन तास चाललेल्या संभाषणात ट्रम्प यांनी कमला हॅरिसवर अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक आणि त्यातील आव्हानांबाबत स्पष्ट मत व्यक्त करताना त्यांच्यावर जोरदार टीका केली.
ट्रम्प यांची अमेरिकन उद्योगपती एलोन मस्क यांची दोन तासांची मुलाखत मंगळवारीच होणार होती, जी सायबर हल्ल्यामुळे नियोजित वेळेपेक्षा उशिरा सुरू झाली.
78 वर्षीय ट्रम्प, जे कमला हॅरिस यांच्याशी पुन्हा अध्यक्ष होण्यासाठी स्पर्धेत आहेत ते कमला हॅरिस यांच्याबद्दल मत व्यक्त करताना म्हंटले की, कमला यांच्या धोरणांमुळे अमेरिकेत अधिक अवैध लोकांचे येणे वाढण्याची शक्यता आहे. तसेच राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्यावर घणाघाती टीका करताना ते म्हणाले की सध्या आमच्याकडे कोणीही राष्ट्राध्यक्ष नाही आणि कमला हॅरिस त्यांच्यापेक्षा वाईट आहेत. त्या सॅन फ्रान्सिस्कोची उदारमतवादी आहेत ज्यांनी शहर, कॅलिफोर्निया उध्वस्त केले आहे आणि आता, परत जर निवडून आल्या तर अमेरिका नष्ट करून टाकतील.
‘अमेरिकेत बेकायदेशीर नागरिकांना स्थायिक करतील.
ट्रम्प यांनी दावा केला की, कमला राष्ट्राध्यक्ष झाल्या तर त्या जगभरातील ५ ते ६ कोटी अवैध नागरिकांना अमेरिकेत स्थायिक करतील. त्यांनी आधी ह्या कमला सुरवात केली आहे. अनेक देश आपले तुरुंग रिकामे करून आपले गुन्हेगार अमेरिकेत पाठवत आहेत. ज्यांच्यामुळे आमच्या घरात गुन्हेगारी आणि हिंसेचे प्रमाण वाढत आहेत. निवडणूक रॅलीत बेकायदेशीर स्थलांतरितांचा उल्लेख असलेल्या फलकामुळेच आपण आपल्यावरील प्राणघातक हल्ल्यातून वाचू शकलो, असाही खुलासा ट्रम्प यांनी यावेळी केला.
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका दिवसेंदिवस रंजक होत चालल्या आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांना अमेरिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळताना दिसत आहे. अशास्थितीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांची चिंता वाढताना दिसत आहे.