Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. आज सर्वोच्च न्यायालयाने सध्या केजरीवाल यांना अंतरिम जामीन देण्यास नकार दिला आहे.
दिल्ली दारू घोटाळा प्रकरणातील आरोपी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सीबीआय प्रकरणात दाखल केलेल्या अंतरिम जामीन याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली आणि न्यायालयाने सध्या या प्रकरणात त्यांचा अंतरिम जामीन देण्यास नकार दिला आहे. तसेच सीबीआयला नोटीस बजावली आहे.
न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया यांच्या खंडपीठाने सुनावणी घेतली, आता केजरीवाल यांच्या नियमित जामिनावर २३ ऑगस्टला सुनावणी होणार आहे. केजरीवाल यांनी जामीन आणि अटकेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.
केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर आता 23 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून, सीबीआयला 23 ऑगस्टपर्यंत उत्तर देण्यासाठी नोटीस बजावली आहे. सिंघवी यांनी प्रकृतीच्या कारणास्तव तात्काळ अंतरिम जामीन मागितला होता, ज्याला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आणि अंतरिम जामिनाची मागणी नाकारली.
यावर सिंघवी म्हणाले, मी अंतरिम जामीन दाखल केला आहे, आरोग्याची समस्या आहे. केजरीवाल यांना अंतरिम जामीन द्यावा, असे मी म्हटले आहे. ईडीच्या खटल्यात कनिष्ठ न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला आहे, मात्र उच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली आहे. ईडी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने स्वतः अंतरिम जामीन मंजूर केला आहे. केजरीवाल यांच्या वतीने वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला.