PM Narendra Modi : देशभरात आज 15 ऑगस्ट रोजी 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करत देशाला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. 103 मिनिटांच्या आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी वन नेशन, वन इलेक्शन या मुद्यांवर देखील लक्ष केंद्रीत केले.
वन नेशन, वन इलेक्शन या मुद्यांवर पीएम मोदी म्हणाले की, “आज प्रत्येक काम निवडणुकीने रंगले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपली मते मांडली आहेत. एक समिती आपला अहवाल तयार करत आहे. वन नेशन, वन इलेक्शनसाठी देशाला पुढे यावे लागेल. भारताच्या प्रगतीसाठी एक राष्ट्र, एक निवडणूक हे स्वप्न साकार करण्यासाठी मी राजकीय पक्षांना पुढे येण्याचे आवाहन करतो.”
भारतातील स्रोतांचा वापर जास्तीत जास्त सामान्य लोकांसाठी करता यावं, त्याचा अपव्यय कमी व्हावा यासाठी देशात वन नेशन, वन इलेक्शन धोरणाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.