Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपांचे खंडन करत जर असे असेल तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईल आणि राजकारण देखील सोडेन, असे म्हंटले आहे. नेमके काय आहे प्रकरण? असं का म्हणाले देवेंद्र फडणवीस? सविस्तर पाहूया…
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणीवस यांच्यावर गंभीर केले होते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा समाजासाठी सर्वकाही करू इच्छितात पण यामध्ये देवेंद्र फडणवीस अडचण आणत आहेत, यावर आज फडणीवस यांनी प्रतिक्रिया देते या आरोपांचे खंडन केले आहे, तसेच जर एकनाथ शिंदे यांनी याची कबुली दिली तर मी पदाचा राजीनामा देईल आणि राजकारण देखील सोडेन. असे म्हंटले आहे.
नेमकं काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
“मुख्यमंत्र्यांकडे सर्व अधिकार आहेत. मुख्यमंत्र्यांपेक्षा कोणताही मंत्री मोठा नसतो. मुख्यमंत्री आणि मी एकत्र काम करतो. मी त्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभा आहे. जोपर्यंत या आरोपांबाबतचा प्रश्न आहे मी जरांगे पाटील यांना मुख्यमंत्र्यांनाच हा प्रश्न विचारायला सांगेन. आणि जर मुख्यमंत्री म्हणत असतील त्यांना मराठा समाजासाठी कोणता निर्णय घ्यायचा होता आणि मी त्यात अडचण आणली आहे तर त्याच वेळी मी माझ्या पदाचा राजीनामा देईल, आणि राजकारण देखीन सोडेल,” असे म्हंटले आहे.
पुढे ते म्हणाले, अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवण्यात काही अर्थ नाही, जर मराठा समाजाच्या हिताचे कोणते निर्णय घेण्यात आले आहेत तर ते माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात घेतले गेले आहेत. शिंदेजींच्या प्रत्येक निर्णयात मी त्यांच्या सोबत आहे. असं देवेंद्र फडणीवस म्हणाले आहेत.