Sikkim Landslide : सिक्कीममध्ये पहाटे दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशनच्या तीस्ता स्टेज 5 धरणाचे पॉवर स्टेशन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये पर्वताचा मोठा भाग वीज प्रकल्पावर पडताना दिसत आहे.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. वीजगृह काही दिवसांपूर्वी रिकामे करण्यात आले होते. येथे गेल्या आठवडाभरापासून दरड कोसळत होती. याच पार्श्ववभूमीवर येथील वीजगृह रिकामे करण्यात आले होते, येथे आधीपासूनच सावधगिरी बाळगल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
A massive landslide hit the NHPC Teesta Stage V Power House in Sikkim.#ViralVideo #Viral #Landslide #Sikkim #PowerCorridors pic.twitter.com/6S1l7llDQG
— POWER CORRIDORS (@power_corridors) August 20, 2024
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत, या भूस्खलनात मोठे दगड पॉवरहाऊसच्या दिशेने वेगाने पडत असल्याचे दिसत आहे. वीज केंद्राजवळ काम करणाऱ्या लोकांनी हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. दरम्यान, या भूस्खलनामुळे जवळच्या १७-१८ घरांचेही नुकसान झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागात भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. ऑक्टोबर 2023 मध्ये तीस्ता नदीच्या खोऱ्यातील ग्लेशियल लेक आउटबर्स्ट फ्लड (GLOF) नंतर स्टेज 5 धरण निष्क्रिय झाले. पुरामुळे उद्ध्वस्त झालेले धरण पुन्हा बांधण्यात येत आहे.