Pharma Company Blast : आंध्र प्रदेशातील अनकापल्ली येथे बुधवारी एका फार्मा प्लांटमध्ये मोठा स्फोट झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला तर ३३ जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेतील मृताचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
या ठिकाणी अजूनही बचाव कार्य सुरु आहे, अचानक झालेल्या स्फोटाने सर्वत्र गोंधळ उडाला आहे, हा अपघात कसा झाला? याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नसून, त्याचा शोध सुरु आहे. जिल्हा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे स्फोट झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
https://x.com/PMOIndia/status/1826352556903465026
आंध्र प्रदेशातील या दुर्घटनेनंतर पंतप्रधान मोदींनी याबद्दल दु:ख व्यक्त करत, या दुर्घटनेतील लोकांना नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असून जखमींना ५० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे,
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. तसेच मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी सरकार उभे राहील, असे आश्वासन दिले आहे.