Badlapur School Girl Rape Case : बदलापूर येथे झालेल्या आंदोलनात विरोधकांचा हाथ असल्याचे सत्ताधारी पक्षातल नेत्यांनी म्हंटले आहे, यावरच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. नेमके आहे पूर्ण प्रकरण पाहूया…
दोन दिवसांपूर्वी रा बदलापूर येथे एका शाळेत सफाई कर्मचाऱ्याने दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. या घटनेनंतर बदलापूर येथील संतप्त नागरिकांनी शाळेच्या बाहेर आंदोलन सुरु केले. याशिवाय बदलापूरमध्ये ‘रेल रोको’ आंदोलन देखील केले, अनेकांनी रेल्वे रुळावर बसून निदर्शने केली अशा स्थितीत या मार्गावरील लोकल गाड्यांची वाहतूक तब्बल 10 तास विस्कळीत झाली होती. आरोपीला फाशी द्या ही एकच मागणी आंदोलकांनी लावून धरली होती.
या आंदोलनकर्त्यांची खुद्द सरकारचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी भेट घेतली तरीही आंदोलक मागे हटले नाहीत. अखेर 10 तासानंतर पोलिसांना आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला. त्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आली. मात्र पोलिसांच्या लाठीचार्जनंतर आंदोलकांनी देखील पोलिसांवर दगडफेक केली.
या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सत्ताधारी पक्षातल नेत्यांनी हे आंदोलन विरोधकांचे कटकारस्थान असल्याचे म्हंटले. राज्याचे मख्यमंत्र्यांनीएकनाथ शिंदेंनी देखील देखील असेच वक्तव्य केले. बदलापूरमधील आंदोलन हे विरोधकांचे कटकारस्थान होते. चिमुरडींवर झालेला अत्याचार ही खेदजनक बाब आहे.
पण हे आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित होतं. या आंदोलनात स्थानिक लोक हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच होते. तर गाड्या भरून या ठिकाणी बाहेरून आंदोलनकर्ते आले होते. त्यांना सरकारची बदनामी करायची होती, असा आरोप त्यांनी केला होता. तर गिरीश महाजन यांनी देखल असेच वक्तव्य केले होते.
https://x.com/rautsanjay61/status/1826306487821762802
यावरच आता संजय राऊतांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सरकारला झापले आहे. तसेच थेट पोलिस रिमांड अॅप्लिकेशनचा फोटो X वर पोट केला आहे. फोटो शेअर करत त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “देवेंद्र फडणवीसजी उघडा डोळे बघा नीट’ बदलापूर आंदोलकांचे हे पोलिस रिमांड अॅप्लिकेशन आहे. सर्व आंदोलक बदलापूरचेच आहेत. आपले मंत्री सांगत होते आंदोलक भाडोत्री आणि बाहेरचे आहेत. काय लायकीची माणसं आपल्या मंत्रीमंडळात आहेत.” असा हल्लाबोल फडणवीसांवर केला आहे.