पुण्यात आज दुपारपासून पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरवात झाली असून गेले काही तास जोराचा पाऊस सुरु आहे. अचानक आलेलया या पावसाने नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडवलेली पाहायला मिळत आहे.
अनेक सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांना पाण्यातून मार्ग काढण्यासाठी कसरत करावी लागली.तसेच अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्यांचे रूप आले होते. घराबाहेर असलेल्या नागरिकांची देखील या पावसाने धांदल उडाली.
पुण्यात दुपारी तीनच्या पावसाने दमदार हजेरी लावली. ढगाच्या गडगडाटासह सुरू झालेल्या पावसाने पुणेकरांची दाणादाण उडवली. पावसाचा अंदाज नसल्याने नागरिक रेनकोट आणि छत्री न घेताच बाहेर पडले होते. मात्र २ तासाहून अधित वेळ चालू असलेल्या पावसाने नागरिकांची मोठी अडचण केली आहे. . पुण्यातील अनेक भागांमध्ये रस्त्यावर पाणी साचल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहनांना मार्ग काढणे अवघड बनले होते. तर अनेक ठिकाणी अनेक दुचाकी पावसामध्ये अडकून पडल्याचे दिसून आले आहे. . पुण्यातील गणेशनगर एरंडवणा भागात अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याची माहितीही समोर येत आहे.
राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला असून अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तर अनेक भागांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली आहे. पुणे शहर परिसरातही गेली सलग तीन दिवस संध्याकाळच्या सुमारास मुसळधार पावसाची हजेरी लागली असून, पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस असणार आहेत, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता.
राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे, पुणे शहरासह ग्रामीण भागात देखील गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस धुमाकूळ घालताना दिसून येत आहे. . पुणे शहर व जिल्ह्यामध्ये ढगांची निर्मिती होत असून, पुढचे काही दिवस परिणामी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.