Eknath Shinde : राज्यातील महिलांच्या सबलीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे, या योजनेअंतर्गत महिलांना आता पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे, राज्यातील बऱ्यापैकी महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे आले आहेत, मात्र, लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झालेल्या पैशांवर बँकांनीच डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावरून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बँकांना इशारा दिला आहे.
कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “बहिणींचे पैसे कापून घ्याल तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला आहे. ते करेक्ट कार्यक्रम करतील. महिलांना त्यांच्या स्वप्न आणि संसारसाठी पैसे दिले आहेत. तुम्ही पैसे कट कराल तर कारवाई करू, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हंटले आहे.
लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यात आल्यानंतर बँकांनी त्या पैशातून मिनिमम बॅलन्सच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वसुली केली
आहे. अशा परिस्थितीत बँकांमधून पैसे काढायला आलेल्या महिलांना रिकाम्या हातांनी परतावे लागले, म्हणूनच महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने आदेश काढावे अशी मागणी महिलांकडून होत आहे.