National Space Day : आज संपूर्ण देश ‘नॅशनल स्पेस डे’ साजरा करत आहे. या दिवशी 23 ऑगस्ट 2023 रोजी इस्रोचे चांद्रयान-3 चे विक्रम रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले होते. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा पहिला देश होता. आज चांद्रयान-३ च्या यशस्वी मोहिमेला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त अवकाश दिवस साजरा केला जात आहे.
आजच्या या खास दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दिल्लीत आयोजित एका विशेष कार्यक्रमात या खास दिवसाचे उद्घाटन करतील. देशभरात हा दिवस सणासारखा साजरा केला जात आहे. शाळा, महाविद्यालयांमध्येही अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आली आहेत.
2023 मध्ये याच दिवशी विक्रम रोव्हरने चंद्रावर पाऊल ठेवले होते. भारतीय अंतराळ मोहिमेतील हा एक अतिशय खास टप्पा होता, कारण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ज्या विक्रम रोव्हरने सॉफ्ट लँडिंग केले होते त्या भागात यापूर्वी कोणीही लँडिंग केले नव्हते. ही मोहीम भारतीय अंतराळ कार्यक्रमासाठी मैलाचा दगड ठरली आहे. या ऐतिहासिक दिवसाच्या पूर्ततेसाठी आजचा दिवस अवकाश दिवस म्हणून साजरा (National Space Day) केला जात आहे.
भारत पुढील वर्षी अंतराळात प्रवासी पाठवणार
भारताने अंतराळ युगात प्रवेश केला आहे. सूर्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी आदित्य एल वन मिशन पाठवले आहे. पुढील वर्षी अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्याचे काम सुरू होईल. या संदर्भात विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे की, “NASA-ISRO सहकार्यांतर्गत भारतीय अंतराळवीर पुढील वर्षी एप्रिलपर्यंत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाऊ शकतात. या मोहिमेसाठी दोन भारतीय गट, कॅप्टन शुभांशु शुक्ला आणि प्रशांत बालकृष्णन नायर हे एक्सिओम स्पेस एक्स-4 मिशनसाठी अमेरिकेत प्रशिक्षण घेत आहेत.