Anil Ambani : भारतीय रोखे आणि विनिमय मंडळाने (सेबी) उद्योगपती अनिल अंबानी यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. सेबीने अनिल अंबानी आणि रिलायन्स होम फायनान्सच्या माजी प्रमुख कार्यकारी अधिकाऱ्यांसह इतर 24 संस्थांना इक्विटी मार्केटमधून 5 वर्षांसाठी बंदी घातली आहे. याशिवाय 25 कोटींचा दंडही ठोठावण्यात आला आहे. कंपनीचा निधी वळवल्यामुळे ही कारवाई करण्यात आले आल्याचे सेबीचे म्हणणे आहे.
याशिवाय सेबीने रिलायन्स होम फायनान्सला सिक्युरिटीज मार्केटमधून सहा महिन्यांसाठी बंदी घातली आहे आणि 6 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
कोणत्या 24 संस्थांवर बंदी घालण्यात आली?
बंदी घातलेल्या 24 संस्थांमध्ये रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अमित बापना, रवींद्र सुधाळकर आणि पिंकेश आर शाह यांचा समावेश आहे. सेबीने अंबानी यांना २५ कोटी रुपये, बापना यांना २७ कोटी रुपये, सुधाळकर यांना २६ कोटी रुपये आणि शहा यांना २१ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
याशिवाय रिलायन्स युनिकॉर्न एंटरप्रायझेस, रिलायन्स एक्सचेंज नेक्स्ट एलटी, रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड, रिलायन्स क्लीनजेन लिमिटेड, रिलायन्स बिझनेस ब्रॉडकास्ट न्यूज होल्डिंग्स लिमिटेड आणि रिलायन्स बिग एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांना प्रत्येकी 25 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
अनिल अंबानींविरोधात सेबीला काय आढळलं?
सेबीने 222 पानांच्या अंतिम आदेशात म्हटले आहे की, “अनिल अंबानी यांनी रिलायन्स होम फायनान्सच्या व्यवस्थापकीय पदांवर नियुक्त केलेल्या लोकांची मदत घेऊन फसवणूक केली. त्यांनी या लोकांसह मिळून रिलायन्स होम फायनान्सचे पैसे इकडून तिकडे वळवले. त्यांच्याशी संबंधित संस्थांना कर्जाच्या नावाखाली हा पैसा इकडे तिकडे वळवण्यात आला. सेबीच्या म्हणण्यानुसार, कंपनीच्या बोर्डानेही त्या कामांवर तीव्र आक्षेप नोंदवला, परंतु व्यवस्थापनाने त्याकडे दुर्लक्ष केले. सेबीने ही कंपनीच्या कामकाजातील गंभीर अनियमितता मानली आहे. आणि ही कारवाई केली आहे