Kolkata rape-murder case : कोलकाता येथील आरजी कार हॉस्पिटलमधील महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टर हत्येप्रकरणी तपास सुरु आहे. दरम्यान, आज विशेष न्यायालयाने या प्रकरणातील आरोपी संजय रॉय याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
सीबीआयने केलेल्या रॉयच्या चौकशीनंतर अनेक खुलासे समोर आले आहेत. सायको रिपोर्टनुसार, संजय रॉय एखाद्या रानटी प्राण्यापेक्षा कमी नाही. चौकशीच्या वेळी तो हसत राहिला.
सायको अहवालात असे देखील दिसून आले आहे की, संजय रॉय हा प्राणी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे आणि तो लैंगिकदृष्ट्या देखील विकृत आहे, सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जिथे हा गुन्हा घडला तिथल्या तांत्रिक आणि वैज्ञानिक पुराव्यांद्वारे संजय रॉय हा गुन्हेगार असल्याचे सिद्ध झाले. मात्र, सीबीसीआय आता डीएनए चाचण्यांच्या निकालांची वाट पाहत आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुन्हा घडण्याआधी संजय रॉयने रेड लाईट एरियामध्ये दारू पिऊन पोर्न क्लिप पाहिल्याचेही तपासात समोर आले आहे. एवढेच नाही तर हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतरही संजय रॉयने पॉर्न व्हिडिओ पाहिला आणि नंतर दारू प्यायली.
आरजी कार हॉस्पिटलचे संपूर्ण प्रकरण?
कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये ९ ऑगस्ट रोजी एका ३१ वर्षीय पीजी ग्रॅज्युएट प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर देशभरात निदर्शने झाली आणि डॉक्टरांनीही संपाची घोषणा केली. मात्र, सर्वोच्च न्यायालयात अपील केल्यानंतर डॉक्टरांनी संप मागे घेतला आणि कामावर परतले.