Eknath Shinde : महाविकास आघाडीने शनिवारी जाहीर केलेल्या बंदविरोधात मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील महाविकास आघाडीला मोठा दणका दिला. कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही, असे हायकोर्टाने म्हणणे आहे. जर कोणी तसा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश मुंबई हायकोर्टाने सरकारला दिले आहेत आणि उद्याच्या माविआच्या महाराष्ट्र बंद साठीची परवानगी नाकारली आहे.
उद्याच्या महाराष्ट्र बंद विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली होती या याचिकेनंतर आज तातडीची सुनावणी पार पडली. डॉक्टर गुणरत्न सदावर्ते यांनी या बंदच्या विरोधात याचिका दाखल केली होती.
हायकोर्टाने स्पष्ट केले आहे की, उद्या कुठल्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही. त्यांना कुठल्याही प्रकारचे तसे अधिकार नाहीत. जर कुणीही अशा प्रकारे बंद करत असेल आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर रित्या कारवाई करावी.
यावरच आता राजचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया देताना विरोधकांना खडे बोल सुनावले आहेत. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, “विरोधकांकडून महाराष्ट्र बंद करण्याचा प्रकार सुरु आहे. ‘येत्या काळात हे राजकारण बंद करा, असे आदेश कोर्टाने दिले आहेत. या बंदला बेकायदेशीर ठरविण्यात आले आहे. कोर्टाने म्हटलय अशा बंदला परवानगी देता येणार नाही. ही कोर्टाने हाणलेली चपराक आहे. मागे सुद्धा कोर्टाने दंड लावलेला, त्यातून सुधरा’, अशी प्रतिक्रिया यावेळी शिंदेंनी दिली आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, लाडकी बहिण योजनेचे राजकारण करुन समाजात द्वेष पसरवण्याचं काम विरोधक करत आहेत. बदलापुरची घटना घडल्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेतली गेली आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू. कुठल्याही परिस्थितीत आरोपीला सोडणार नाही. हे सरकार संवेदनशील आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
विरोधकाचे काही तरी सुरु आहे? राज्यात काहीतरी भंयकर घडवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कोणी म्हणत आहे बांग्लादेश होईल. तर कोणी पुरोगामी महाराष्ट्रात आहे म्हणत आहेत, सत्तेसाठी विरोधक खालच्या पताळीवर जाऊन प्रचार करत आहेत. जर तुम्ही संवेदनशील असाल, तर या दुर्देवी घटनेचे राजकारण बंद करा, असेही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.