Hezbollah Attack : इस्रायल आणि हमास यांच्यातले युद्ध सुरु असतानाच आता हिजबुल्लाह देखील इस्रायलवर हल्ले करत आहे. यावेळी हिजबुल्लाह संघटनेने मोठा हल्ला चढवला आहे. हिजबुल्लाहने रविवारी 11 इस्रायली लष्करी भागांवर 320 कात्युशा रॉकेट डागले आहेत. यानंतर इस्त्रायल सैन्याने देखील प्रत्युत्तरात ताबडतोब त्यांच्या अनेक ठिय्यांवर जोरदार हल्ला चढवला. दोघांमधील सुरु असलेल्या या युद्धात आता आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.
इस्रायल आणि हिजबुल्लाह मध्ये का तापले युद्ध?
हिजबुल्लाह आपल्या एका कमांडरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इस्रायलवर ड्रोन हल्ले केले आहे. हा हल्ला इस्रायली लष्करी ठिकाणांवर करण्यात आल्याचे या गटाने म्हटले आहे. या हल्ल्यात शत्रूची अनेक ठिकाणे, बॅरेक आणि आयर्न डोम प्लॅटफॉर्मलाही लक्ष्य करण्यात आली असलयाचे त्यांनी म्हंटले आहे . हिजबुल्लाहने म्हटले आहे की, हा हल्ला फौद शुकूरच्या हत्येचा बदला आहे, जो संघटनेचा सर्वोच्च कमांडर होता.
अनेक वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार, उत्तर इस्रायलमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजवण्यात आले. देशाच्या बेन-गुरियन आंतरराष्ट्रीय विमानतळानेही खबरदारीचा उपाय म्हणून उड्डाणे वळवली. यानंतर लगेचच हिजबुल्लाहने आपल्या हल्ल्याची घोषणा केली.
Hezbollah responds with direct precision attack on Israel.
320+ strikes launched towards Israel in retaliation.
One of these caught on camera moments ago. pic.twitter.com/Rat7mhG35Q
— Mr AP (@MisterAP7) August 25, 2024
इस्रायलने दिला इशारा
इस्त्रायली लष्कराचे प्रवक्ते रिअरॲडमिरल डॅनियल हगारी यांनी रविवारी सकाळी सांगितले की, “या धोक्यांना तोंड देण्यासाठी इस्त्रायली सैन्याने लेबनॉनमधील दहशतवादी लक्ष्यांवर हल्ला केला आहे जिथून इस्त्रायली नागरिकांवर हल्ले करण्याची योजना आखली होती.” .
“हिजबुल्लाह इस्त्रायलवर मोठ्या प्रमाणावर हल्ला करण्याची तयारी करत आहे, लेबनीज नागरिकांना धोक्यात आणत आहे, आम्ही ज्या भागात हिजबुल्ला कार्यरत आहे तेथे राहणाऱ्या नागरिकांना चेतावणी देत आहे त्यांनी ताबडतोब या धोक्यापासून दूर जावे. आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.”