कोलकातामध्ये 31 वर्षीय महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याची घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात आली. या घटनेवरून अनेक जणांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. राजकीय वर्तुळात यावरून एकमेकांवर जोरदार टीका देखील सुरू आहे.
असे असतानाच आता अभिनेत्री आणि राजकारणी असलेल्या हेमा मालिनी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मी विनंती करते की या संदर्भात योग्य तो निर्णय लवकरात लवकर घ्यावा.कारण संपूर्ण देश या बाबतीतल्या निर्णयाची वाट पाहत आहे गुन्हेगाराला खरोखरच शिक्षा झाली पाहिजे असे वक्तव्य हेमा मालिनी यांनी केले आहे.
बंगालमध्ये जे घडले ते अतिशय चुकीचे आहे. भाजपचे कार्यकर्ते प्रकरणावर निषेध करत आहेत आणि ते योग्य आहे.एका महिलेवर अत्याचार झाला आहेे त्यामुळे त्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे असे देखील त्या म्हणाल्या आहेत.
या घटनेच्या निषेधार्थ पश्चिम बंगाल ज्युनियर डॉक्टर्सने आज कोलकाता येथे निषेध मोर्चा काढला आहे.
हा मोर्चा पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा या उद्देशानेच काढण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेवरून विद्यार्थ्यांनी कोलकत्तामध्ये नबन्ना मार्च काढला आहे. कोलकत्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे . कोलकत्ता अत्याचार प्रकरणी तपास चालू असून देखील विद्यार्थ्यांनी नबन्ना मार्च काढला यामुळे पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांवर लाठी चार्ज देखील करण्यात आला आहे.