Jammu Kashmir Election 2024 : पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा निर्णय घेतला आहे, त्यांनी या नवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यांनी बुधवारी याविषयी माहिती देत निवडणूक न लढण्याचे कारणही सांगितले आहे. आपण मुख्यमंत्री झालो तरी केंद्रशासित प्रदेशात आपल्या पक्षाचा अजेंडा पूर्ण करू शकणार नाही, असे त्या म्हणाल्या.
यावेळी त्या म्हणल्या, ‘मी भाजपसोबत असताना (2016)मुख्यमंत्री होते, तेव्हा 12 हजार व्यक्तींच्या विरोधातील गुन्हे मी रद्द केले, आता ते मी करु शकणार नाही. मोदी सरकारसोबत असताना फुटीरवाद्यांशी चर्चा करण्यासाठी पत्र लिहिलं होते. तसेच पत्र आज मी लिहू शकत नाही, असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, जम्मू आणि काश्मीर निवडणुकीसाठी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांच्यातील युतीबाबत त्या म्हणाल्या की, दोन्ही पक्ष नेहमीच केवळ सत्तेसाठी एकत्र येतात. “आम्ही 2002 मध्ये काँग्रेससोबत युती केली तेव्हा आमचा एक अजेंडा होता. आम्ही सय्यद अली गिलानीला तुरुंगातून सोडले. आज ते करण्याचा विचार करू शकत नाही.”
आम्ही 2014 मध्ये भाजप सरकारसोबत युती केली तेव्हा आमचा अजेंडा होता. कलम ३७० ला हात लावला जाणार नाही, AFSPA रद्द करणे, पाकिस्तान आणि हुर्रियतशी चर्चा करणे, वीज प्रकल्प परत करणे इ., आम्ही नेहमीच लोकांच्या पाठिंब्यावर आणि लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी निवडणुका स्वतंत्रपणे लढलो आहोत,” असेही त्या म्हणाल्या.
जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील निवडणूक १८ सप्टेंबरला, दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक २५ सप्टेंबरला आणि तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक १ ऑक्टोबरला होणार आहे.