Puja Khedkar : प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकरची उमेदवारी यूपीएससीकडून रद्द करण्यात आली. पूजा खेडकरनी बनावट अपंगत्व प्रमाणपत्र तसे ओबीसी, नॉन क्रिमीनेअर प्रमाणपत्र बनवले असे आरोप तिच्यावर ठेवण्यात आले. यामुळेच पूजा खेडकरची उमेदवारी रद्द करून आयोगाला फसवल्यामुळे भविष्यात कोणतीही परीक्षा देता येणार नाही अशा सूचना तिला दिल्या गेल्या आहेत.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर यूपीएससीकडून भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी खबरदारी घेतली जात आहे. यामुळेच आता केंद्र सरकारने पहिल्याच नोंदणी आणि भरती प्रक्रियेत उमेदवाराची ओळख पटावी यासाठी आधार कार्ड व्हेरिफिकेशन करण्यास परवानगी दिली आहे.परंतु हे व्हेरिफिकेशन ऐच्छिक असणार आहे असे देखील सांगितले आहे.
प्रशिक्षण मंत्रालयाने या संदर्भात नोटिफिकेशन काढले आहे. यामध्ये सर्व माहिती सांगण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून देखील आधार व्हेरिफिकेशनसाठी परवानगी मिळाली आहे. यूपीएससीला वन टाइम रजिस्ट्रेशन पोर्टलवर नोंदणी करत असताना उमेदवारांची ओळख पटवण्यासाठी ऐच्छिक आधारावर ऑथेंटिकेशन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ई केवायसी ऑथेंटिकेशन सुविधेचा उपयोग देखील यामध्ये करण्यात येणार आहे.
दरम्यान, आयोगाला आधार अधिनियम २०१६ मधील सर्व तरतुदी, याचसोबत त्याअंतर्गत बनवण्यात आलेले नियम आणि विनियम यांचे पालन करावे लागणार आहे तसेच भारतीय विशिष्ट्य ओळख प्राधिकरणाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे देखील पालन करावे लागणार आहे असे सांगण्यात आले आहे.