Mamata Banerjee : कोलकाता रेप-मर्डर प्रकरणावरून दिवसेंदिवस पश्चिम बंगालमधले वातावरण खराब होत चालले आहे. दररोज राज्यातील रस्त्यांवर आंदोलने होत आहेत. अशातच भाजपने बुधवारी बंदची हाक दिली होती. यादरम्यान अनेक ठिकाणी हिंसा झाली. त्यावरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भाजपवर चांगल्याच भडकल्या आहेत.
बुधवारी टीएमसीच्या विद्यार्थी संघाच्या परिषदेत बोलताना ममतांनी भाजप नेत्यांवर सडकून टीका केली होती. यावेळी त्यांनी मोदींना इशारा देत जर ‘बंगाल पेटले तर आसाम, ईशान्य, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा आणि दिल्लीही पेटेल. आम्ही तुमची खुर्ची खेचू, असे म्हंटल्या होत्या.
आता ममतांच्या याच वक्तव्यावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पलटवार केला आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्टमध्ये लिहिले की, ‘दीदी, तुमची आसामला धमकी देण्याची हिम्मत कशी झाली? आम्हाला डोळे दाखवू नका. तुमच्या अपयशी राजकारणातून भारत पेटवण्याची भाषा करू नका. अशी फूट पाडणारी भाषा बोलणे तुम्हाला शोभत नाही.” असे म्हणत त्यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे.
दीदी, आपकी हिम्मत कैसे हुई असम को धमकाने की? हमें लाल आंखें मत दिखाइए। आपकी असफलता की राजनीति से भारत को जलाने की कोशिश भी मत कीजिए। आपको विभाजनकारी भाषा बोलना शोभा नहीं देता।
দিদি, আপনার এতো সাহস কীভাবে হলো যে আপনি অসমকে ধমকি দিচ্ছেন? আমাদের রক্তচক্ষু দেখাবেন না। আপনার অসফলতার… pic.twitter.com/k194lajS8s
— Himanta Biswa Sarma (@himantabiswa) August 28, 2024
सरमा यांच्या पाठोपाठ मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनीही ममतांवर निशाणा साधला आहे. पुर्वोत्तर राज्यांना धमकावण्याची तुम्ही हिंमत कशी केली, असे म्हणत त्यांनी याचा निषेध केला आहे. ममतांनी संपूर्ण देशाची माफी मागायला हवी. असे बिरेन सिंह यांनी म्हंटले आहे. पुढे ते म्हणाले, हिंसा आणि विद्वेष पसरवणे त्यांनी बंद करायला हवे. एखाद्या राजकीय नेत्याने सार्वजनिक व्यासपीठावरून हिंसेची धमकी देणे चुकीचे आहे.
तर ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझीही त्यांच्या वक्तव्यावर भडकले आहेत. यावर प्रतिक्रिया देत ते म्हणाले. “ओडिशाविषयी अशी आपत्तीजनक भाषा बोलण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? ओडिशा हे एक शांतताप्रिय राज्य आहे. येथील लोक जबाबदार आणि जागरूक आहेत. तुमच्या या भूमिकेचा स्वीकार राज्यातील जनता कधीच करणार नाही,”