मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. मराठा आरक्षण आंदोलनाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानंतर त्याविषयीची बैठक घेण्यात आली. पण ही बैठक संपतानाच आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण करणार असल्याचे जाहीर केले आहे. येत्या 29 सप्टेंबर रोजी मनोज जरांगे उपोषणाला बसणार आहेत.
यानंतर एकच खळबळ उडालेली दिसून आली मंचावरुनच जरांगेनी उपोषणाची घोषणा करताच कार्यकर्ते भांबावले.काही महिलांनी आक्रोश सुरु केला. जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण करु नये अशी त्यांना विनवणी करु लागल्या. कार्यकर्त्यांना पण भडभडून आले. त्याचवेळी जरांगे पाटील जागेवरुन उठले आणि त्यांनी बैठक संपल्याचे जाहीर केले.
मराठा समाजाला निराश होऊ देणार नाही. मी हताश झालेलो नाही, उपोषण हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. त्यासाठी मी आरपार आमरण उपोषण करणार आहे, असा इशारा यावेळी मनोज जरांगे यांनी दिला आहे.
उपोषणाने आरक्षण मिळवायचे आणि आमदारही पाडायचे असे जरांगे म्हणाले आहेत.काही झाले तरी आता देवेंद्र फडणवीस यांची जिरवणारच असा इशारा देत विरोध करणारे भाजपचे आमदार पाडायचे म्हणजे पाडायचेच असे ते म्हणाले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मराठा आरक्षणाला खोडा बसला. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी फडणवीस प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे