India-Pakistan Relations : देशाचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे. पाकिस्तानसोबत आता चर्चा करण्याची वेळ निघून गेली असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
मंत्री जयशंकर म्हणाले, ‘पाकिस्तानशी अखंड चर्चेचे युग संपले आहे. जोपर्यंत जम्मू आणि काश्मीरचा संबंध आहे, कलम ३७० रद्द करण्यात आले आहे, त्यामुळे आपण पाकिस्तानशी कोणत्या प्रकारचे संबंध ठेवू शकतो हा मुद्दा आहे. मला हे सांगायचे आहे की आपण निष्क्रीय नाही आणि घटना सकारात्मक किंवा नकारात्मक दिशा घेत असली तरी आपण कोणत्याही प्रकारे प्रतिक्रिया देऊ.
#WATCH दिल्ली में एक पुस्तक विमोचन कार्यक्रम में पाकिस्तान पर विदेश मंत्री डॉ. एस जयशंकर ने कहा, 'पाकिस्तान के साथ निर्बाध बातचीत का युग ख़त्म हो गया है…जहां तक जम्मू-कश्मीर का सवाल है, धारा 370 खत्म हो गई है तो मुद्दा यह है कि हम पाकिस्तान के साथ किस तरह के रिश्ते पर विचार… pic.twitter.com/RpFDiKcxpy
— ANI_HindiNews (@AHindinews) August 30, 2024
यावेळी त्यांनी शेजारील बांगलादेशमधील सध्याच्या परिस्थितीवरही भाष्य केले. बांगलादेशसोबतच्या संबंधांबाबत परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर म्हणाले, “आम्हाला तत्कालीन सरकारशी बोलावे लागेल हे स्वाभाविक आहे. राजकीय बदल झाले आहेत आणि ते विस्कळीत होऊ शकतात, हे आम्हाला मान्य करावे लागेल. आपल्याला या परिस्थितींना अधिक पारस्परिकतेने हाताळावे लागेल.” असे यावेळी म्हंटले आहे.
तसेच मालदीवबाबतही बोलले केले आहे. ते म्हणाले, “अलीकडच्या काळात भारत आणि मालदीवमध्ये संबंध चांगले राहिलेले नाहीत. ‘मालदीवबद्दलच्या आमच्या दृष्टिकोनात चढ-उतार आले आहेत. इथे स्थिरतेचा अभाव आहे. मालदीवशी आमचे जुने संबंध आहेत. हे नाते त्यांच्यासाठी ताकदीचे आहे, असा विश्वास मालदीवमध्ये आहे. अशास्थितीत त्यांच्यासाठी हे नाते खूप महत्त्वाचे आहे कारण ते सध्या आर्थिक आव्हानांचा सामना करत आहे.