कोलांट्याउड्या मारायची स्पर्धा असती तर त्या स्पर्धेत शरद पवार यांना सुवर्णपदक मिळालं असतं, असं म्हणतं भाजपनेते व विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांना जोरदार टोला लगावला आहे.
सांगलीतील विट्यातं भाजपनेते पंकज दबडे यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याला आमदार नितेश राणे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत एकत्र आले होते.यावेळी गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली.
यावेळी पडळकर पुढे म्हणाले की, शरद पवार यांच्या पक्षात जाणाऱ्या लोकांची मला खरंच कीव येतेय.कारण २०२४ ची विधानसभा निवडणूक ही त्यांची शेवटची निवडणूक असेल त्या निवडणुकीनंतर त्यांचा पक्ष हा अस्तित्वातचं राहणार नाहीं.मग आज जे शरद पवारांच्या पक्षात जात आहेत ते २०२९ नंतर कोणत्या पक्षात जातील ? याचा त्या लोकांनी आधी विचार करावा मग पक्ष प्रवेश करावा, असंही ते पुढे म्हणाले.
सोबतचं सध्या महाविकास आघाडीतले नेते फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर तुटून पडतायत.आज देवेंद्र फडणवीसांची वेळ खराब असेल,पण नशीब नाही.म्हणून जरा वेळ जाऊ द्या, मग पहा फडणवीस कसे तावून – सलाखून बाहेर पडतात ते. तसंच ज्यावेळी फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा या भागातील टँकरचे मोर्चे संपले,चारा छावणीची मागणी संपली.कारण केंद्रातून आणि राज्यातून एका वेळी ५० हजार कोटी महाराष्ट्रच्या योजनांना त्यांनी मुख्यमंत्री असताना मिळवून दिले असंही पडळकर पुढे म्हणाले.