ओ सर्वज्ञानी संजय राऊत !! आम्ही विशाळगडावरील अतिक्रमण काढलं तेव्हा चकार शब्द तरी काढला का? हिचं का तुमची शिवभक्ती? अशा तिखट शब्दात भाजपनेत्या चित्राताई वाघ यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर हल्ला चढवला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये राजकोट किल्ल्याच्या परिसरात उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यांतच कोसळला. ही घटना सोमवारी 26 ऑगस्ट रोजी घडली. यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसत आहे. तसेच राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विरोधक सातत्याने या घटनेवर भाष्य करत आहेत, दरम्यान खासदार संजय राऊत देखील जोरदार टीका करत आहेत. यावरच आता चित्रा वाघ यांनी X वर पोस्ट शेअर करत विरोधकांना सुनावले आहे.
ओऽऽऽसर्वज्ञानी @rautsanjay61
विशाळगडावरील अतिक्रमण काढले, तेव्हा चकार तरी बोलतात काय…?
हीच का तुमची शिवभक्ती…?— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) September 1, 2024
सिंधुदुर्गमधील मालवण येथील घडलेल्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील माफी मागितली. मात्र, बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागितली, त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर मग्रुरी होती. अशी टीका केली. यावर देखील चित्रा वाघ यांनी खरपूस समाचार घेतला.
आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी माफी मागितली, त्याचवेळी त्यांच्या चेहऱ्यावर मग्रुरी होती, असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले ही फार मोठी शोकांतिका आहे..
स्वातंत्रवीर सावरकर यांचा वारंवार अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्यावर अजून काय होणार..?
झालेल्या घटनेबद्दल… pic.twitter.com/JHFy8Q9qRq
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) September 1, 2024
यावर त्या म्हणल्या, “आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी माफी मागितली, त्याचवेळी त्यांच्या चेहऱ्यावर मग्रुरी होती, असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले ही फार मोठी शोकांतिका आहे…स्वातंत्रवीर सावरकर यांचा वारंवार अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्यावर अजून काय होणार..?
झालेल्या घटनेबद्दल माफी मागतानाच, सोबत वीर सावरकरांचे नाव घेणे ही जर उद्धव ठाकरेंना मग्रुरी वाटत असेल, तर ते अतिशय दुर्दैवी आहे. ज्या वीर सावरकरांनी शिवरायांवर सुंदर अशी आरती लिहिली, त्यांचे नाव घेणे तुम्हाला मग्रुरी वाटते..?
तुमच्या मनातील सावरकर द्वेष आज पुढे आला आणि आपण हिंदुत्व सोडले यावर पुन्हा एकदा आज शिक्कामोर्तब झाले..! लक्षात ठेवा ज्यांनी हिंदुत्व सोडले त्यांना आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेण्याचा सुद्धा अधिकार नाही…” अशा शब्दात त्यांनी सुनावले आहे.