Vanraj Andekar : गणेशोत्सवाच्या तोंडावरच पुणे शहरात रविवारी रात्री मोठा राडा झाला. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची काल डोक्यात कोयता आणि फ्री स्टाईल गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना ना पेठ परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी १२ तासांच्या कारवाई करत काहींना अटक केली आहे.
पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईत आतापर्यंत 3 जणांना अटक करण्यात आली आहे. आंदेकर यांची हत्या कौटुंबिक वादातून झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. दरम्यान, पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेल्या 3 जणांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे.
नेमकं काय घडलं रविवारी रात्री?
ही घटना रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास नाना पेठेतील डोके तालीम परिसरात घडली. वनराज आंदेकर या परिसरात थांबले होते, त्यावेळी हल्लेखोरांनी त्यांच्यावर कोयत्याने वार केले. ते कोसळल्यावर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. आणि हल्लेखोर तेथून पळून गेले, हा सर्व प्रकार तेथील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. याच्या मदतीने पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आणि तीन जणांना ताब्यात घेण्यात आले.
पुण्यात भीतीचे वातावरण
पुण्यात गणपतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, अशातच ऐन गणपती सणाच्या तोंडावर फ्री स्टाईल गोळीबार झाल्याने पुण्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, अशातच आता पुणे पोलिसांकडून गणपती सणात कठोर निर्बंध लावण्यात येऊ शकतात.
आंदेकर कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी
वनराज आंदेकर हे २०१७ सालच्या महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर नगरसेवक म्हणून निवडून आले होते. विशेष म्हणजे वनराज आंदेकर यांच्या मातोश्री राजश्री आंदेकर या देखील २००७ आणि २०१२ या दोन वेळा नगरसेविका होत्या. वनराज आंदेकर यांचे चुलते उदयकात आंदेकर हेही नगरसेवक होते. २०२० त्यांचं देखील अल्पश्या अजाराने निधन झाले आहे. त्यांच्या कुटुंबातील वत्सला आंदेकर यांनी पुणे शहराचे महापौर पद भुषविले आहे. १९९८-९९मध्ये पुणे महापालिकेच्या महापौर म्हणून त्या निवडून आल्या होत्या.