राष्ट्रीय स्वयंसेवक दलाची केरळमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. मुख्यत्वे महिला सुरक्षा आणि जातीय जनगणना यावर संघाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जातीय जनगणनेबाबत बोलताना हयातून समाजाच्या एकता आणि अखंडतेला धोका आहे असे राष्ट्रीय स्वयंसेवक दलाने म्हटले आहे.
जातीय जनगणनेवर बोलताना संघाचे अखिल भारतीय प्रचारक सुनील आंबेकर म्हणाले आहेत की, राष्ट्रीय एकीकरणासाठी जातीगणता महत्त्वपूर्ण आहे पण जातीगणनेचा वापर केवळ निवडणूक प्रचार आणि निवडणुकीच्या उद्देशाने न होता कल्याणकारी उद्देशाने त्याचा वापर झाला पाहिजे. त्यासोबत सरकारने दलित समाजाची लोकसंख्या जाणून घेण्यासाठी त्यांची देखील जनगणना केली पाहिजे.
पश्चिम बंगालमध्ये झालेल्या घटनेचे पडतात राज्यात उमटत असताना या घटनेवरून राष्ट्रीय स्वयंसेवक दलाकडून देखील चिंता व्यक्त केली गेली आहे . महिलांची सुरक्षा हा संवेदनशील मुद्दा आहे असे संघाने म्हटले आहे. यामुळेच या बैठकीत महिला सुरक्षेबाबत पाच टप्प्यांमध्ये म्हणजेच कायदा, जागरूकता, संस्कार, शिक्षण आणि आत्मसंरक्षण या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण होत असून या पार्श्वभूमीवर सामाजिक परिवर्तनासाठी काम करण्याची योजना संघाने आखली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अहिल्याबाई होळकर यांची 300 वी जयंती साजरी करण्याचा निर्णय देखील घेतला आहे.